ईतर

करमाळा घटनेचे पडसाद पंढरपूरात: दिग्विजय बागल वर कारवाई करा;या मागणीसाठी सर्व पक्ष संघटना आल्या एकत्र

सर्वपक्षीय जाहीर निषेध करत सहकार मंत्र्यांनी कारवाई करावी केली मागणी

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : काल मकाई सहकारी साखर कारखाना करमाळा येथे मागील वर्षीच्या गाळप हंगामातील थकीत असलेले शेतकऱ्यांचे सहा कोटी रुपयाचे ऊस बिल सनदशीर मार्गाने मागणीसाठी कारखान्यावर गेलेल्या शेतकरी व स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वतः गुण घेऊन मारहाण केली,जीवे मारण्याची धमकी दिली त्या घटनेचा निषेध म्हणून आज पंढरपूर मध्ये दिग्विजय बागल यांचा सर्वपक्षीय कडून निषेध करण्यात आला.

मागील वर्षीचे उसाचे बिल न देता आलेल्या शेतकऱ्यांची व संघटनेच्या प्रतिनिधींची मुस्कटदाबी होत असेल तर या जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो जो बिलासाठी भिडतो त्याच शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करून गुंड घेऊन मारहाण करतो तो मोकळा फिरत असेल तर हा महाराष्ट्र आहे? का बिहार आहे? त्याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे या पैसे बुडव्या चेअरमन व तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला जेरबंद केले पाहिजे व शेतकऱ्यांची बिलाची रक्कम त्वरित मिळाले पाहिजे, बेकायदेशीर रीत्या सुरु असलेला मकाई कारखाना तात्काळ बंद करून जोपर्यंत शेतकऱ्यांची पुर्ण एफआरपी ची रक्कम देत नाहीत तोपर्यंत कारखाना सुरू करता येत नाही परंतु यांनी सर्व कायद्याला हरताळ पासून बेकायदेशीर कारखाना सुरू ठेवला आहे. आणि वरून बिला साठी न्याय मागणारा शेतकरी संघटनेच्या अंगावर मारण्यासाठी गुण घेऊन आले आहेत अशा चेअरमनच्या मुसक्या आवळून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी आज पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी सर्व पक्ष सर्व संघटना व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरा कडून करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक यांना सर्व संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष,संभाजी ब्रिगेड,बळीराजा शेतकरी संघटना,रयत क्रांती संघटना,मनसे,भाजप,दुर्गाताई माने सामाजिक कार्यकर्त्या इत्यादी पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते.

[आज पंढरपूर मधील सर्व पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्त्यानी महाराष्ट्र राज्याला दाखवुन दिले आहे जरी आम्ही वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनेत असलो तरी आमचा मुळ उद्देश एकच आहे जर आमच्या एखाद्या सहकार्यावर कोन हात उचलायचा प्रयत्न करत असेल तर त्याचा माज सगळे मिळून उतरवु शकतो हे लक्षात ठेवा.
बिल बुडव्या आणि बेकायदेशीर पणे कारखाना चालवणार्या चेअरमन वर सहकार मंत्री यांनी कारवाई करावी, सोलापूर जिल्ह्यातील साखर सम्राट शरद पवारांचा फोटो कार्यालयात लावुन सहकारी कारखाने लुटत आहेत यामध्ये त्यांनी लक्ष घालावे.

सचिन पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटना]

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close