ईतरशैक्षणिक

जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात ८४२ कोर्सेस मध्ये मुलींना फी माफ केली

संपादक – दिनेश खंडेलवाल 

जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात ८४२ कोर्सेस मध्ये मुलींना फी माफ केली

जाहिरात…    जाहिरात…    जाहिरात…

पंढरपूर(प्रतिनिधी):- आजचे जग ज्ञानावर सुरु आहे. विकास हा ज्ञानातून होतो. ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे. जग हे संशोधनावर श्रीमंत झाले आहे. ज्ञान नसेल तर तंत्रज्ञानात पुढे जाता येणार नाही, जगात पुढे जायचे असेल तर नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर या संस्थेच्या स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुउद्देशीय इमारत, विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण तसेच मुलींचे नऊ मजली नूतन वस्तीगृह पायाभरणी सोहळा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे,आमदार अभिजित पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे, सचिव सूरज रोंगे, डॉ.अनिकेत देशमुख,विभाग प्रमुख एम एम पवार,जि. प माजी सदस्य वसंतनाना देशमुख तसेच कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात…    जाहिरात…    जाहिरात… 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जगातले सवोर्त्तम ज्ञान भारतात होते. नालंदा, तक्षशिला जगातील पहिली विद्यापीठे होती. आपल्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची पूर्तता करायची असेल तर सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणसंस्थातून निर्मित होणे गरजेचे आहे. तसेच नाविन्यपूर्ण संशोधनासाठी शिक्षणसंस्थेबरोबर शासन राहिल. राज्यात ८४२ कोर्सेस ना मुलींना फी माफ केलेली आहे. मुलींच्या वसतीगृहाशिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणार नाही. सुरक्षित वसतीगृहे आवश्यक आहे. मुलींच्या वस्ती गृहाला पर्याय नाही. कमवा व शिका या योजनेतेर्गत राज्यातील ५ लाख मुलींना किमान दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचे उद्दिष्ट आहे. यावर शासन काम करत आहे. मुलींना मोफत शिक्षण व इतर शैक्षणिक आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्या खुप शिकतील असे ही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी उद्दीष्टपुर्ती करण्यासाठी माणसाला ध्येय लागते. रोंगे सरांनी मेहनत घेवून स्वेरी संस्था नावारुपाला आणली असे गौरोवद्गार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close