
संपादक – दिनेश खंडेलवाल
स्वेरी लाॅ काॅलेज व नवीन बहुउद्देशीय इमारत, सुसज्ज क्रिडांगणाचे उद्घाटन ना. चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते
मुलींचे नऊ मजली नूतन वस्तीगृह क्रमांक ४ चा पायाभरणी सोहळा
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर रांजणीच्या माळरानावर २७ वर्षांपूर्वी डॉक्टर बी पी रोंगे सरांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या भविष्यासाठी तंत्रशिक्षणाचे इवलेसे रोप लावले होते त्याचे वटवृक्ष आज दिमाखात डौलत आहे. श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून एका छोट्याश्या खोलीपासून सुरुवात केलेली शिक्षणाची ज्ञानगंगा आज पाहता पाहता २७ वर्षाच्या कालावधीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक एक पाऊल पुढे टाकत शिक्षणाची यशस्वी कारकीर्द जपत शिक्षणाचे नंदनवन फुलवले आहे. ग्रामीण भागातील व शहरातील आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाबरोबरच परराज्यातील विद्यार्थ्यांनाही यशस्वी करत यशाची उज्वल परंपरा जपली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी कुचंबणा लक्षात घेऊन या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातील नवे पाऊल टाकत स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर सुरू करत आहेत. त्याचबरोबर नवीन बहुउद्देशीय इमारत विद्युत प्रकाशझोताच्या सुविधेने सुसज्ज असे भव्य क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच मुलींचे ९ मजली नूतन वस्तीगृह क्रमांक ४ चा पायाभरणी सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे हे भुषवणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा आवताडे, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे, सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. सर्वांचे स्वागत स्वेरी चे संस्थापक प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे,अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे करणार आहेत. तरी पंढरपूर सह ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्राध्यापक डॉ. बी पी रोंगे यांनी दिले आहे.
प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांनी स्वेरी या संस्थेच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाचे ज्ञानामृत अनेक पिढ्यांना देत आले आहेत. या माध्यमातून तंत्रशिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागात प्रवाहित करण्यात यशस्वी ठरले आहेत. पंढरपूरच्या यशस्वी आणि गौरवशाली रोप्यमहोत्सवी वाटचाली सोबत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या श्रेणीत असणाऱ्या विधी महाविद्यालयाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करत आहेत.
जाहिरात… जाहिरात… जाहिरात…
स्वेरी या शैक्षणिक संस्थेमध्ये डॉ. बी पी रोंगे सरांनी लॉ कॉलेज सुरू करून कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली आहे. आत्ता पर्यंत बी फार्मसी, डी फार्मसी, डिप्लोमा, इंजीनियरिंग डिग्री कॉलेज सुरू करून असंख्य विद्यार्थ्यांना भारतात तसेच परदेशामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध कंपन्यांचे कॅम्पस आपल्या स्वेरी संस्थेत भरवून येथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना याच ठिकाणी नोकरी उपलब्ध करून दिली जाते तसेच शिक्षणाबरोबरही नोकरीची संधी मिळते. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी चे उज्वल भविष्य स्वेरी ने घडवले आहे.