ईतरशैक्षणिक

सध्याचे जग ज्ञानावर आणि संशोधनाच्या जोरावर श्रीमंत झाले – -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील

स्वेरीमध्ये लॉ कॉलेज व भव्य क्रीडांगणाचे उदघाटन आणि मुलींच्या नूतन वसतीगृहाची पायाभरणी कार्यक्रम संपन्न

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सध्याचे जग ज्ञानावर आणि संशोधनाच्या जोरावर श्रीमंत झाले – -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील

स्वेरीमध्ये लॉ कॉलेज व भव्य क्रीडांगणाचे उदघाटन आणि मुलींच्या नूतन वसतीगृहाची पायाभरणी कार्यक्रम संपन्न

जाहिरात…    जाहिरात…    जाहिरात…

पंढरपूर(प्रतिनिधी):- ‘आज जागतिक स्तरावर भारताला क्रीडा क्षेत्रात पदके मिळत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे. एशियायी आणि राष्ट्कुल स्पर्धेमध्ये भारताने पदके मिळविली असून आता ऑलम्पिक स्पर्धेचे ध्येय आहे म्हणून जे ध्येय बाळगतात ते काहीतरी करायचे ठरवितात. पुढे ध्येयवेडी माणसं धाडसी बनतात. त्याप्रमाणे डॉ. रोंगे सरांनी धाडसाने स्वेरी या शिक्षणसंकुलाची उभारणी केली. जग हे ज्ञानावर आणि संशोधनाच्या जोरावर श्रीमंत झाले आहे. म्हणून जगाची दिशा पाहून शिक्षणासाठी डॉ. रोंगे सर जे कार्य करतील त्यास सदैव सहकार्य असेल’ असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

‘स्वेरीमध्ये स्वेरीज् लॉ कॉलेज पंढरपूर, नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाशझोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचे उदघाटन आणि मुलींच्या ९ मजली नूतन वसतीगृह क्र. ४ च्या पायाभरणी सोहळ्या’ च्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे हे होते. प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी स्वेरीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची वाटचाल, एकाची पाच महाविद्यालये, तसेच स्वाईप व एसव्हीआयटी अशा आणखी दोन संस्थांची वाटचाल, मिळालेली मानांकने, निधी याबाबत सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पालकमंत्री ना. गोरे म्हणाले की, ‘डॉ. रोंगे सर, तुम्ही असेच सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या प्रयत्नात सातत्य ठेवा कारण प्रगतशील महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे संस्थेच्या पाठीशी राहतील. त्यावेळी मी संस्था व विद्यार्थी हितासाठी सहकार्याची भूमिका बजावेन. शिक्षणात अडचणी येवू नयेत यासाठी या जिजाऊच्या लेकींसाठी भविष्यात विविध योजना आणल्या जातील. यामुळे मुलींना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील. मुलींना प्राधान्य देणाऱ्या स्वेरीच्या वाटचालीचे कौतुक वाटते.’ अशा शब्दात गौरव केला. यावेळी स्वेरी कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. याप्रसंगी पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांचा ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून केलेल्या कार्याबद्दल डॉ. बी. पी. रोंगे सरांचा देखील सन्मान झाला.

जाहिरात…    जाहिरात…    जाहिरात…

यावेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधानदादा आवताडे, माढा मतदार संघाचे आमदार अभिजीतआबा पाटील, सांगोला मतदार संघाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, विधान परीषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतन सिंह केदार, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, गोपाळपूरच्या सरपंच सौ.पुष्पा बनसोडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. विकास भोसले व त्यांचे पदाधिकारी, पोलीस उपअधिक्षक आयपीएस प्रशांत डगळे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. डॉ. सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही. एस. शेलार, एन.एस. कागदे, धनंजय सालविठ्ठल, दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, बी.डी.रोंगे, विश्वस्त एन. एम. पाटील, इतर विश्वस्त,कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, अन्य महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close