सामाजिक

स्वभिमानी मराठा महासंघाचे पहिले अधिवेशन आज पंढरपूरात

मराठा आरक्षणासह विविध विषयावर होणार चर्चा

संपादक – दिनेश खंडेलवाल

स्वभिमानी मराठा महासंघाचे पहिले अधिवेशन आज पंढरपूरात

मराठा आरक्षणासह विविध विषयावर होणार चर्चा

पंढरपूर(प्रतिनिधी):- स्वाभिमानी मराठा महासंघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आज पंढरपूर येथे होणार आहे. मराठा आरक्षणासह विविध विषयावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्या बरोबरच इतर ही राज्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली आहे.

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या या अधिवेशनासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती पुरस्कार सन्मानित डॉ. कृषीराज टकले पाटील, कार्यक्रमाचे सभा अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य भूषण एम. के. सागर, कार्यक्रम गौरव अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष अनिताताई पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे, दक्षता आघाडी प्रदेश

अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा अलका ताई सोनवणे, राज्य संपर्क प्रमुख ओंकार राजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्वाभिमानी मराठा महासंघ अराजकीय भुमिकेतून मराठा, कुर्मी, पटेल समाजाला देशभर एकत्र करत आहे. मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न, शिवस्मारक, गडकिल्ले संवर्धन असे विविध प्रश्नांवर संघटना कार्य करत आहे. मराठा, कुर्मी, पटेल समाज देशातून या अधिवेशनात सामील होणार आहे. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी स्वाभिमानी मराठा महासंघाचे युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश जाधव, पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय देठे, सांगोला तालुका अध्यक्ष काकासाहेब पवार प्रयत्नशील आहेत.

या अधिवेशनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोपडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close