स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीने श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनलचा विजय निश्चित!
अभिजीत पाटील गटाची ताकद वाढली तर सभासदांचा उत्साह शिगेला
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या अन्याय साठी लधणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिजीत पाटील यांच्या गटाशी युती केल्याने अभिजित पाटील यांचे पारडे जड झाले असेल विठ्ठल च्या निवडणुकीत श्री विठ्ठल परीवर्तन विकास पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे.
श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीत दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. सत्ताधार्यांचे येथे झाले नसल्याने तिरंगी किंमत चौरंगी निवडणूक होईल अशी शक्यता सभासद वर्गातून वर्तवली जात असली तरीही सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये अभिजीत पाटील निवडणुकीसाठी स्वतः उभे राहून त्यांनी त्यांचे पॅनल उभा केल्याने सभासदांचा त्यांना वाढता पाठिंबा लाभत आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातमिळवणी केल्यामुळे त्यांची ताकद ही वाढल्याचे दिसत आहे.
मा.खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विठ्ठलच्या निवडणूकीसाठी अभिजीत पाटील गटाकडे युतीसाठी हात पुढे केला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व पुन्हा कारखाना सुरळीत चालावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अभिजीत पाटील यांच्या गटासोबत युतीसाठी हात पुढे केला आहे. विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ हे सत्तेत असताना गेल्या दहा वर्षाच्या काळात सभासद शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. तसेच दोन हंगाम कारखाना बंद राहिल्याने अनेक सभासद शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अभिजीत पाटील यांची भेट घेऊन युतीसाठी हात पुढे केला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,विष्णु बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे,विधी जिल्हाध्यक्ष ॲड.विजयकुमार नागटीळक, युवा जिल्हा कार्याध्यक्ष मनोज गावंधरे,तालुका अध्यक्ष सचिन पाटील,साहेबराव नागणे,सचिन आटकळे, रणजीत बागल,नाना चव्हाण,सोमनाथ घोगरे,कांताभाऊ नाईकनवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युवराज पाटील गट व भालके गटाच्या युतीची शक्यता झालेल्या बैठकीत मावळली आहे. युवराज पाटील गटातील कार्यकर्त्यांनी भालके गटासोबत जाणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर नेत्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. त्यामुळे विठ्ठल परिवारात पडलेली दरी आज रुंदावत गेल्याचे चित्र आहे. याचा फायदा श्रीविठ्ठल विकास परिवर्तन पॅनलला नक्कीच होणार असल्याचे बोलले जाते.
[“विठ्ठलच्या सभासद शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.आमची संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे.ज्या लोकांनी विठ्ठल वर कर्जाचा डोंगर उभा केला आणि स्वतः मात्र स्वार्थ साधून घेतला त्यांना आमचा विरोध आहे.भगीरथ भालके व युवराज पाटील दोघेही सत्तेत असताना कारखाना अधोगतीला गेला आहे.कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे व तो चांगल्या प्रकारे चालला पाहिजे .अभिजीत पाटील चांगल्या प्रकारे कारखाना चालवू शकतात ही खात्री आहे.यामुळे आम्ही अभिजीत पाटील यांच्यासोबत युती करत आहोत.”
सचिन पाटील
पंढरपूर तालुका अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना]