पंढरीत चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टी उत्साहात
पंढरीतील स्टेशन मज्जिद दर्गा येथे झाली इफ्तार पार्टी

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टी उत्साहात
पंढरीतील स्टेशन मज्जिद दर्गा येथे झाली इफ्तार पार्टी
पंढरपूर : मुस्लिम समाजातील रमजान महिन्यातील इतर पार्टीला मोठे महत्त्व असते सर्व मुस्लिम बांधवांसोबत
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा युवा नेते अभिजित आबा पाटील यांनी स्टेशन मज्जिद पंढरपूर येथे इफ्तार पार्टी कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. यामध्ये हिंदू – मुस्लिम बांधव व महिला भगिनींची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. दरम्यान चेअरमन अभिजीत पाटील यांनी सर्व उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांना यांच्या रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्टेशन मज्जिद येथे इफ्तार सुरू करण्यात आला. सदर प्रसंगी सर्व समाज बांधवांच्या भेटी घेत रमजानच्या शुभेच्छा देत सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या महिन्यात प्रत्येकाकडून रोजाचे पालन केले जाते. यात पहाटेच्या वेळी उपवास सुरु करताना सहरी केली जाते तर सोडताना इफ्तार केला जातो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. इफ्तारच्या वेळी पंढरपूरातील असंख्य हिंदू-मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते.
दरम्यान अभिजीत पाटील यांचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रत्येक ठिकाणी पाटील यांची उपस्थिती असून प्रत्येक कार्यक्रमात ते उस्फुर्तपणे सहभागी होत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महागायक आदर्श शिंदे यांचा गुरुशिष्य वंदना कार्यक्रमात चला करूया अभिजीत पाटील आबाला आमदार करूया या गाण्यामुळे मोठंच राजकीय वातावरण ढवळले आहे. प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक सणात मोठ्या उत्साहात सहभागी होत असताना दिसत आहेत. त्यांना नागरिकांकडून देखील वाढत्या संपर्कामुळे बोलवण्यात येत असल्याने अभिजीत पाटील यांची देखील उपस्थिती दर्शविताना दिसते.