शिक्षकांना वाढीव वेतन मिळण्याचा मार्ग सोपा; वाढीव विस टक्के अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी
मा आ दत्तात्रय सावंत सह अंशता अनुदानित शिक्षकांच्या प्रयत्नांना यश
संपादक – दिनेश खंडेलवाल
शिक्षकांना वाढीव वेतन मिळण्याचा मार्ग सोपा;
वाढीव विस टक्के अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी
मा आ दत्तात्रय सावंत सह अंशता अनुदानित शिक्षकांच्या प्रयत्नांना यश
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यातील शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वाढीव वेतन मिळण्यासाठी अनेक दिवसापासून लढा सुरू असून महाराष्ट्रातील शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत व त्यांचे इतर सहकारी हे मंत्रालय परिसरात उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी मा आ दत्तात्रय सावंत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मा आ सावंत यांनी हॉस्पिटलमध्येही आपले उपोषण सुरूच ठेवले होते. त्याची दखल घेत आज शासनाने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत शिक्षकांच्या मागण्या मान्य करीत अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकडयांवरील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव विस टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत मा आ दत्तात्रय सावंत यांनी नारळ पाणी घेत आपले उपोषण मागे घेतले आहे.
मा आ दत्तात्रय सावंत हे शिक्षक चळवळीतुन तयार झालेले नेतृत्व असून शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते नेहमी अग्रही असतात. कायम विना अनुदानित शाळांचा कायम शब्द काढून त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी तसेच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ शिक्षकांना मिळावा यासाठी मैदानात, सभागृहात तसेच न्यायालयात लढा देण्याचे काम ते करीत आहेत.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. शिक्षक समन्वय संघ प्रयत्नशील होता. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षक बांधवांसाठी आमरण उपोषण पुकारले होते. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या मागणीला यश आले असून शासनाच्या निर्णयानंतर आता शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वाढीव वेतन मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.