जुनी पेंशन साठी विधानभवनावर धडकणार पेंशन मार्च
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
मुंबई : महाराष्ट्र शासनाने दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची DCPS/NPS योजना सुरू केली आहे. या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यामध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण आहे. मात्र मागील १६ वर्षातील या DCPS / NPS योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्तीवेतन मिळतांना दिसत नाही. ज्यामुळे मागील १६ वर्षात मयत किंवा सेवानिवृत्त झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शन पासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे निंदनीय आहे. त्यामुळे दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ पूर्ववत लागू करावे अशी मागणी शिक्षक सहकार संघटना महा.राज्य या संघटनेने वारंवार मागणी विविध आंदोलने करून करत असल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे पुणे विभागीय सरचिटणीस तथा जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीचे राज्य समन्वयक दिपक परचंडे यांनी सांगितले.
शासनाने वेळोवेळी फक्त आश्वासने देऊन वेळोवेळी कर्मचाऱ्यांची फक्त फसवणूकच केली आहे, असे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी सांगितले.त्यामुळे शासनाविषयी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या अन्यायी धोरणविरुद्ध सर्व शासकीय, निमशासकीय संघटना कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, ग्रामसेवक, तलाठी, लिपीकवर्गीय, चतुर्थश्रेणी तथा अन्य संवर्गीय पदाच्या कर्मचारी संघटना एकत्र येऊन या सर्वांनी दि. २२ नोव्हेंबर २०२१ ते ०८ डिसेंबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातून “पेन्शन संघर्ष यात्रा” काढली होती. त्यानंतर राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपपूर येथे घोषित असल्यामुळे सेवाग्राम ते नागपुर विधानभवन “पायी पेन्शन मार्च” काढण्यात येणार होते. मात्र राज्याचे हिवाळी अधिवेशन दि. २२ डिसेंबर २०२१ पासून मुंबई येथे घोषित झाल्यामुळे उपरोक्त “पेन्शन मार्च” दि. २१ डिसेंबर २०२१ पासून नाशिक – मुंबई महामार्गावरील ग्राम पडघा येथील विठ्ठल रुखमाई मंदिर येथून सुरू होऊन विधानभवन मुंबई येथे धडकणार आहे. सदर पायी पेन्शन मार्च हे शांतता पूर्वक मार्गाने केले जाणार असून कोव्हिड- १९ च्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.
“दि. २२ नोव्हेंबर २०२१ ते ०८ डिसेंबर २०२१ दरम्यान काढण्यात आलेल्या पेन्शन संघर्ष यात्रेमधून कर्मचाऱ्यांमध्ये ‘जुनी पेन्शन हा आमचा हक्क आहे व तो आम्हाला मिळाला पाहिजे,’ ही जाणीव झाली असून त्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. या पेन्शन मार्च साठी जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनाआणि त्यांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या ‘पेंशन मार्च’ मध्ये सर्व कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रविराज खडाखडे यांनी केले आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com