राजकिय

रंगल्या चर्चा, लागल्या पैजा कौल नक्की कोणाला?निवडून कोण येणार याकडे लक्ष

उमेदवाराचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद;वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर?

संपादक – दिनेश खंडेलवाल 

रंगल्या चर्चा, लागल्या पैजा कौल नक्की कोणाला?निवडून कोण येणार याकडे लक्ष

उमेदवाराचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद;वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर?

पंढरपूर(दिनेश खंडेलवाल):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढाईमध्ये मतदानाचा टक्का सर्वात जास्त झाल्यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात पडणार, कोणाला जीवदान देणार, कोण निवडून येणार, यासाठी गावागावात चौका चौकात चर्चा रंगू लागल्या, पैजा लागू लागल्या, कोणाला कौल मिळणार, यासाठी मतदारांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये बेरीज वजाबाकी वाढू लागल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ६९.५१ टक्के इतके मतदान झाल्याने याचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळणार हे येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी समजणार आहे.

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असले तरीही वाढलेल्या टक्केवारी मधून मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार यासाठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या विकास कामावर भर दिल्यामुळे तसेच लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांचे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पाठीमागे जनता आहे असे सांगितले जात होते. जनतेच्या विश्वासावर आपला विजय निश्चित असल्याने पंढरपूर मतदार संघाचा आमदार भालके असतील असे त्यांच्या कार्यकर्त्यातून सांगितले जाते. वाढलेले मतदानाची टक्केवारी ही आपल्या फायद्याची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांचे कार्यकर्ते सांगत असतानाच मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी जनतेसाठी केलेली आंदोलने, मदत, सहकार्य, शहरातील मूलभूत गरजेचे स्वखर्चाने केलेले काम या जोरावर विजय आपलाच होणार असे कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.

मतदार संघातील गावागावांमध्ये चौकामध्ये पारावर प्रत्येक उमेदवारांचे कार्यकर्ते बेरीज वजाबाकीची गणिते मांडून आपला नेता आपला उमेदवार कशा पद्धतीने विजयी होणार हे सांगताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पैजाही लागल्या जात असून मतदारांचे कौल आपल्या बाजूने असल्याचे सांगितले जाते.

[ …बा विठ्ठला आमचा उमेदवार निवडून यावा कार्यकर्त्यांचे देवाला साकडे……..

पंढरपूर शहरांमध्ये चार उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थाने लढत झाली असली तरीही अनेक ठिकाणी दोन उमेदवारांचे वर्चस्व दिसून येत होते. त्यामुळे आता आपापल्या उमेदवाराचे कार्यकर्ते हे आपला उमेदवार कशा पद्धतीने आघाडीवर आहे. मतदारांचे कशा पद्धतीने आपल्याला साथ लाभलेली आहे. आपला विजय निश्चित आहे. असे ठामपणे सांगताना दिसतात मात्र असे असले तरीही अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला साकडे घातले जात आहे. माझा नेता, माझा उमेदवार अमुक अमुक मताधिक्याने विजयी होऊ दे. याबाबत आता पंढरीत चर्चा रंगू लागल्याचे दिसत आहे. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close