शैक्षणिक

संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाला सदिच्छा भेट

मौलिक सूचना देत केली जागेसाठी पाहणी

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

अकलूज : जयराम घाडगे– शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूरला सदिच्छा भेट दिली.

वेळापूर येथील श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे जागेत श्री अर्धनारीनटेश्वर महाविद्यालय उभारणार आहे . हे महाविद्यालय तालुक्याच्या दक्षिण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मंडळाचे माजी अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टच्या जागेत महाविद्यालयासाठी अद्ययावत इमारत बांधण्याचा संकल्प केला आहे . त्या दृष्टीने या जागेची पाहणी मंडळाचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केली.


या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख व सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश साळुंखे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय माने, विरकुमार दोशी, तुकाराम जगदाळे, आस्लम शेख, महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य दादा साठे, प्रा. बिटू मोलाणे-भोसले, प्रा. मनोज नांगरे, प्रा. अभिजीत घाडगे, प्रा. आशा गायकवाड, प्रा. उर्मिला कोडग, राजेंद्र बामने, रविंद्र साळुंखे इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


वेळापूर परिसरात महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू होत आहे त्याची पाहणी करून संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी काही मौलिक सूचनाही केल्या.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-                दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close