विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, रस्ता सुरक्षा व किशोरवयीन मुला-मुलींची केली जनजागृती
पंढरपूर विधी सेवा समितीचे कायदे विषयक शिबीर संपन्न

संपादक-दिनेश खंडेलवाल
विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, रस्ता सुरक्षा व किशोरवयीन मुला-मुलींची केली जनजागृती
पंढरपूर विधी सेवा समितीचे कायदे विषयक शिबीर संपन्न
पंढरपूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमातंर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व अधिवक्ता संघ, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक 6 जानेवारी, 2023 रोजी प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज पंढरपूर येथे कायदे विषयक शिबीर संपन्न झाले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर डॉ. शब्बीर अहमद औटी आणि मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर नरेंद्र जोशी यांच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे, यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यायाधीश एम. आर. कामत, यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास बालिका दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एम. आर. कामत यांनी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींना पोक्सो कायदा, रस्ता सुरक्षा व किशोरवयीन मुला-मुलांचे अधिकार याबाबत जनजागृती करुन विद्यार्थींशी संवाद साधला.
सदर कार्यक्रमा दरम्यान विधीस्वयंसेवक सुनिल यारगट्टीकर यांनी मुलांना केंद्र शासन व राज्य शासनाकडून उपलब्ध करुन दिलेल्या सार्वजनिक उपयोगिता सेवा बद्दल माहिती सांगितली तसेच माजी सरकारी वकील अॅड. एम. टी. मेंडिगीरी यांनी “प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स” म्हणजे पोक्सो कायद्याविषयी मुलांना माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव अॅड. राहुल बोडके, कार्यक्रमाची प्रस्तावना भगवान मुळे, अध्यक्ष अधिवक्ता संघ पंढरपूर, आभार एम. एम. नाईकनवरे, उपाध्यक्ष पंढरपूर अधिवक्ता संघ यांनी केले. प्रोग्रेस विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व संतोष गायकवाड सह शिक्षक यांनी प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थितांची मुलांना ओळख करुन दिली.
कार्यक्रमास अॅड. महेश कसबे, विधीस्वयंसेवक सुनिल यारगट्टीकर, नंदकुमार देशपांडे, पांडुरंग अल्लापूरकर, अॅड. अंकुश वाघमारे, न्यायालयीन कर्मचारी, प्रशालेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.