ईतर

पैलवानाचे रक्त अंगात आहे;विरोधकांना त्यांची जागा दाखवणार-भगीरथ भालके

भगीरथ भालकेंनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार!

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : माझ्या अंगात पैलवानाचे रक्त असून चुकीच्या पद्धतीने मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही विरोधकांनाही त्या पद्धतीने त्यांची जागा दाखवणार असल्याची प्रतिक्रिया विठ्ठलचे चेरमन भगीरथ भालके यांनी खेड भोसे देवडे आवे तरडगाव या प्रचारसभेत बोलताना व्यक्त केली.

स्व. आमदार भारत नाना भालके यांनी विधानसभेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी विकास काय असतो हे उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना मानसिक आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले होते.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यात विखुरलेले आहे. आजवर सभासदांना कोणतीही अडचण आणली नाही. तर अडगळीत पडलेल्या युवराज पाटलाला समाजात आणून दहा वर्षे विठ्ठलचे संचालक पद दिले होते. मात्र त्यांनी भारत नाना असताना कोणतीही तक्रार केली नाही.

साखर आयुक्त हायकोर्ट तक्रारी दाखल करून अडचणी निर्माण करून आज ते सभासदांना, कामगारांना पगार देत नसल्याचे सांगत आहे. पंचवीस वर्षे युवराज पाटलांनी सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवला नाही. परंतु भगीरथ भालके सहा महिन्यापासून नॉटरिचेबल असल्याचे सांगत आहे. सभासद व कामगारांचा रोश भगीरथ भालके यांच्यावर कसा येईल हे काम युवराज पाटील यांनी केलेआहे. असे भगीरथ भालके बोलताना म्हणाले.

यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, संचालक गोकुळ जाधव, दसरथ खळगे,सुधाकर कवडे,कांतीलाल भिंगारे, उत्तम नाईकनवरे,नंदकुमार पाटील,हनुमंत पवार,बंडू पवार,नारायण शिंदे, शालिवाहन कोळकर,महेश कोळेकर,नंदकुमार उपासे, पोपट शिंदे,पिंटू झांबरे, उल्हास पाटील,सागर कडलास्कर, आदी सह कार्यकर्ते सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close