विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबर अण्णा पाटील यांच्या 98 व्या जयंती निमित्त युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरीत होणार शेतकरी मेळावा
विठ्ठलची धुरा युवराज पाटील यांच्या हाती द्यावी सभासदातून मागणी
- लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : माजी आमदार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी येथील कर्मवीर औदूंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विठ्ठल हॉस्पिटलच्या वतीने कॅन्सर रोग,मेंदू विकार व नेत्रतपासणी शिबिराचे आयॊजन करण्यात आले होते. तर या प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची झालेली दुरावस्था,कर्जाचा बोजा आणि सभासद,कामगार यांच्यावर कोसळलेले आर्थिक संकट याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा युवराज पाटील यांच्या हाती देण्यात यावी अशीही मागणी अनेकांनी केली.यावेळी रावसाहेब पाटील,रावसाहेब चव्हाण,दामोदर पवार ,राजेंद्र पाटील,अभिजित पाटील,प्रकाश पाटील,बाळासो पाटील,महेश पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.