राज्य

विठ्ठलाच्या भक्तांकडून मंदिरास एका वर्षात मिळाले ५४ कोटीचे दान

वारकरी भाविकांना अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न

संपादक – दिनेश खंडेलवाल

विठ्ठलाच्या भक्तांकडून मंदिरास एका वर्षात मिळाले ५४ कोटीचे दान

वारकरी भाविकांना अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न

पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला महाराष्ट्रासह इतर राज्यातून येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांनी एका वर्षामध्ये समितीच्या विविध माध्यमातून सुमारे ५४ कोटी रुपयांचे दान केले आहे.

याबाबत मंदिर समितीकडून मिळालेली अधिक माहिती अशी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस दिनांक १ जानेवारी ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत ५३ कोटी ९७ लाखाचे दान प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने दर्शनरांग व्यवस्थापन, अन्नछत्र, लाडूप्रसाद, निवास इत्यादीचा समावेश आहे. याशिवाय, भाविकांना श्रींच्या नित्यपुजा, पाद्यपुजा व तुळशीपूजा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या पायांना खडे टोचू नये म्हणून दर्शनरांगेत मॅटींग, विश्रांती कक्ष, आपत्कालिन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला शाबुदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर, चहा, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल इ. उपक्रम मंदिर समितीने सुरू केले आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पुजेसाठी वाढती मागणी विचारात घेऊन, नित्यपुजेत २ भाविक कुटुंबियांना संधी, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पुजा सुरू केल्या असून, त्याची नोंदणी देखील ऑनलाईन करण्यात आली आहे, या नोंदनीस भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मंदिर समितीस वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत असून, मिळालेल्या दानातून श्रींच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.

वारकरी भाविकभक्तांची पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी वर अनन्य साधारण श्रद्धा असल्याने आषाढी मध्ये वारकरी, भावीक आळंदी ते पंढरपूर दिंडी मधून पायी चालत येतात. विठ्ठलाचे भक्त हे सर्वसामान्य मध्यम वर्गातील व गोरगरीब वर्गातील असल्याने विठ्ठलाकडे केलेली मागणी पूर्ण होते ही आस घेऊन ऊन,वारा, पावसाची तमा न बाळगता मजल दरमजल करत पायी चालत विठ्ठल भेटीसाठी पंढरीत येत असतात. यामध्ये कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणे असल्याने एक वेळ पोटाला न खाता हे वारकरी भक्त विठ्ठलासाठी दान करत असल्याने सन २०२४ मध्ये विठ्ठलाच्या चरणी विविध माध्यमातून याच भक्तांनी सुमारे ५४ कोटीचे दान दिले आहे.

• [ वारकरी भाविकांनी केलेले दान अशाप्रकारे…………
श्रींच्या चरणाजवळ ६२५८९७९७/-, लाडूप्रसादातून ५८५२६९००/-, देणगीतून ८१८९८४१७/-, भक्तनिवासातून ९८४७८२७९/-, पुजेतून २३३८६३१२/-, फोटो, मोबाईल लॉकर व महावस्त्रातून ९२३३०४९/-, हुंडीपेटीतून ७५६७४०५२/-, सोने-चांदीमधून २७२०४४५०/- परिवार देवता मंदिरातून ३०९१४२०३/-, विधि उपचारातून ५९८८४३७/- तसेच इतर जमेतून ५८११८५६/- असे एकूण ५३ कोटी ९७ लाख ५ हजार ७५२ रूपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ]

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close