बिझनेस

विठ्ठल पोती पूजनानंतर चंद्रभागेवर अभिजीत पाटलांचा डाव;त्यात आजी माजी संचालकांची साथ!

चंद्रभागेच्या आजी माजी संचालकांच्या हस्ते केले विठ्ठलच्या ११ साखर पोत्यांचे पूजन

संपादक-दिनेश खंडेलवाल

विठ्ठल पोती पूजनानंतर चंद्रभागेवर अभिजीत पाटलांचा डाव;त्यात आजी माजी संचालकांची साथ!

चंद्रभागेच्या आजी माजी संचालकांच्या हस्ते केले विठ्ठलच्या ११ साखर पोत्यांचे पूजन

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन२०२२- २३ चे गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्याचे पुजन चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक इस्माईल मुलाणी, कालिदास पाटील, ज्ञानोबा कराळे, मधुकर नाईकनवरे, बिभिषण पवार, हनुमंत सुरवसे, बाळासाहेब कौलगे, आशिष यादव, दिनकरबापू कदम, दिनकर चव्हाण, पंढरीनाथ लामकाने, महादेव नाईकनवरे, , नामदेव ताड, सुभाष भोसले, अँड. सारंग आराध्ये, एच.एम. बागल व भिमराव रोंगे यांचे शुभहस्ते व विठ्ठल चे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील, मार्गदर्शक बब्रुवाहन रोगेसर व व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील म्हणाले की कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी ३५ हजार एकर क्षेत्राची ऊसाची नोंद झालेली असून त्यापासून अंदाजे १२ ते १५ लाख मे. टन गाळप होणार आहे. त्याकरिता कारखान्याने सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभी केलेली आहे. कारखान्याचे गाळप व्यवस्थितरित्या सुरु झाले आहे. निवडणूकीमध्ये वचन दिल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही सर्व दिलेल्या शब्दांचे पालन केलेले आहे व येथून पुढेही पालन करु तसेच थकीत ऊस बील दिले व सभासदांची दिवाळी गोड व्हावी याकरिता बाहेरील कारखान्याची साखर उपलब्ध करून दिवाळी साखर वाटप ही केले.

सभासदाच्या आर्शीवादांमुळे सत्तेवर आलेपासून अवघ्या १५ दिवसामध्ये कारखाना चालू केलेला आहे. ऊस हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना २५००रू. भाव देऊन ऊस कुठेही काटा करून आणावा असे जाहीर अवाहन देखील चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.

कारखाना चालू करणेसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक, वर्क्स मैनेजर, चिफ केमिस्ट व सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेवून कारखाना चालू केलेला आहे व आज पाडव्याच्या मुहुर्तावरती पहिल्या ११ साखर पोत्याचे पुजन संपन्न झाले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे कौतुक केले. संचालक मंडळाने ठेवलेल्या ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करणेसाठी सभासदांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व ऊसाचे आम्ही गाळप करणार असल्याचे सांगितले.

स्वागत व प्रस्ताविक प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी केले.

सदर प्रसंगी कार्यलक्षी संचालक तुकाराम मस्के, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, चंद्रभागा कारखान्याचे माजी संचालक इस्माईल मुलाणी, मधुकर नाईकनवरे, चंद्रभागा कारखान्याचे संचालक दिनकरबापू कदम, किरण घोडके, लवटे, अॅड. सारंग आराध्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश मुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोडले, तसेच प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड व सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचितक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट———[

कारखाना चालवणारा माणूस म्हणून ओळख असलेले विद्यमान चेअरमन अभिजीत पाटील यांनी दोन वर्षापासून बंद असलेला श्री विठ्ठल सह सा. कारखाना सुरू करुन कारखान्याचे यशस्वी गाळप देखील सुरू केले. चंद्रभागेच्या आजी माजी संचालकांच्या हस्ते विठ्ठलचे साखर पोती पूजन म्हणजे विठ्ठल जिंकला आता चंद्रभागेच्या तयारी अशी चर्चा आता पंढरपूर तालुक्यात रंगताना दिसत आहे. विठ्ठल परिवारा मध्ये पंढरपूर तालुक्यात तीन साखर कारखाने असून चंद्रभागेची येत्या काही दिवसांत निवडणूकीचे बिगूल वाजणार आहे. तरी चेअरमन अभिजीत पाटील यांनी चंद्रभागेच्या संचालकांकडून विठ्ठल कारखान्याचे साखर पोती पूजन केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून आता निवडणूकीत अभिजीत पाटील हे काय भुमिका बजावणार याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close