विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व युवराज दादा पाटील यांच्याकडे द्यावे सभासदाची मागणी
विठ्ठल परिवाराच्या आजच्या मेळाव्याकडे लागले विरोधकांचे लक्ष
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून मानला जाणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदाच्याही वर्षी बंद आहे. त्यामुळे विठ्ठल परिवारामध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी काही जणांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी संचालक युवराज पाटील यांच्या मागणी नुसार एक बैठक घेतली. बैठकीमध्ये कारखान्याबाबत विचारमंथन झाले. कारखान्याला री स्ट्रक्चर करण्यासाठी मुदत व काही अटी शिथिल करण्याची मुभाही दिली गेली परंतु अद्यापपर्यंत त्याबाबत कुठलिही तजबीज न झाल्यामुळे कारखाना बंद करण्याची नामुष्की यंदाच्या वर्षीही आली आहे. त्यामुळे कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय औदुंबर आण्णा पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकरी, कामगार व सभासदांच्या मेळाव्याचे आयोजन संचालक युवराज पाटील यांनी केले आहे. या मेळाव्यामध्ये आज पर्यंतच्या घडलेल्या घडामोडी व कारखान्याच्या पुढील वाटचालीबाबत विचारमंथन केले जाणार असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने विठ्ठल च्या रणधुमाळी ची ही सुरुवात होत असल्याचेही बोलले जात आहे
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक मा. आमदार कै. औदुंबर अण्णा पाटील यांच्या 98 व्या जयंतीचे औचित्य साधून विठ्ठलकारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी मंगळवारी ( ता. 23 ) दुपारी पंढरपुरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांच्या या शेतकरी मेळाव्यालामहत्व आले असून स्व. औदुंबर आण्णा पाटील गटाने शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी केली असून तालुक्यातील सर्व गावांमध्ये या मेळाव्याचे निरोप सभासद कामगारांना पोहोचवण्यात आले असून ज्या ज्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या सभासद , कामगार व आण्णा प्रेमी आहेत त्यासर्वांपर्यंत मेळाव्याचा निरोप देण्यात आला आहे .