तालुक्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी अभिजीत पाटील यांच्या पॅनलला विजयी करा-अनिल यादव
विठ्ठल साखर कारखाना निवडणूक रणसंग्राम; अनिल यादव सभासदाच्या भेटीसाठी थेट बांधावर
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा व गतवैभवाची ओळख असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या रणसंग्रामाला सुरूवात होण्या अगोदरच अभिजीत पाटील यांच्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुस्ते येथील अनिल यादव सभासदाच्या गाठीभेटीसाठी थेट बांधावर जावून सभासदांची भेट घेत आहेत.
सर्वसाधारण ऊस उत्पादक तुगंत गटातून अनिल यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छाननी प्रक्रियेत रथी महारथीचे अर्ज अवैद्य ठरले असतानाही यादव यांचा अर्ज वैद्य ठरला आहे. आपली उमेदवारी फिक्सच असल्याने त्यानी या गटात असणा-या जुन्या जाणत्या सभासदांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. या गटात जवळपास 5300 इतके मतदान करणारे सभासद असून त्यांच्या सुस्ते या मुळगावी 434 मतदार सभासद आहेत.
बंद पडलेले साखर कारखाने चालू करून त्यांना उर्जितअवस्था प्राप्त करणारे ऑक्सिजन मॅन अभिजीत पाटील हे श्री विठ्ठल साखर कारखाना जोमाने चालवतील यामुळे सभासदांना व ऊस उत्पादक शेतक-यांना परत सुखाचे व समाधानाचे दिवस पहावयास मिळतील तसेच गोरगरीब मंजुरांच्या चुली कायम पेटत राहातील त्यांना सुखाचे चार घास खावयास मिळतील. तालुक्याला गतवैभव पुन:श्च प्राप्त होण्यासाठी अभिजीत पाटील व त्यांच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन अनिल यादव यांनी सभासदांना केले आहे.
सदर प्रसंगी विजय रणदिवे, पंकज लामकाने, श्रीकांत चव्हाण, कुमार सालविठ्ठल, शंकर सुर्वे, नितीन सालविठ्ठल, अमित सपाटे, शंकर पवार, रणजीत चव्हाण, तुषार बोबडे, हर्षदिप भांगे, तानाजी सालविठ्ठल उपस्थित होते.