श्री विठ्ठल कारखान्यावरील घटनेतील दुसऱ्या कामगाराचा ही मृत्यू
एका कामगाराचा जागीच मृत्यू;तर दुसरा उपचारा दरम्यान मयत

संपादक-दिनेश खंडेलवाल
श्री विठ्ठल कारखान्यावरील घटनेतील दुसऱ्या कामगाराचा ही मृत्यू
एका कामगाराचा जागीच मृत्यू;तर दुसरा उपचारा दरम्यान मयत
पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना दोन वर्षानंतर प्रथमच
गळीत हंगाम सुरू झाला होता. नेहमी प्रमाणे कारखाना सुरू असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास कारखान्यामधील बॉयलिंग हाऊस मध्ये काम करत असताना हाऊस स्टीम प्रेशर वॉल फेल होऊन तुटून त्याचा दणका उपस्थित कामगारास बसल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसर्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अपघातावेळी गंभीर जखमी झालेल्या कर्मचारीवर तत्काळ पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी ९.३०च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
सदर घटनेची समजलेली अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीनंतर चेअरमन झालेले अभिजीत पाटील यांनी अथक प्रयत्न करून यंदा प्रथमच सुरू करत गळीत हंगाम सुरु केला.
दरम्यान चालू हंगामात कारखान्याचे दोन लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्टही कारखान्याने पूर्ण केले आहे. मात्र दुर्दैवाने आज सकाळच्या सुमारास कारखान्याच्या बॉयलिंग हाऊस मध्ये काम सुरू असताना हाऊस स्टीम प्रेशर वॉल फेल होऊन सदरचा अपघात घडला आहे. अपघातावेळी सुधाकर सदाशिव चौगुले (रा. सांगवी ता. पंढरपूर) व सोमनाथ मारुती नरसाळे (रा.जळोली ता. पंढरपूर)हे उत्पादन विभागाचे दोन कर्मचारी स्टीम वालचे काम करत होते. मात्र यावेळी यंत्रणेत बिघाड होऊन स्टीम वाॅल निकामी झाला तसेच त्याचा दणका दोन्ही कामगारांना बसल्याने उंचीवरून कामगार खाली पडल्याने यामध्ये सुधाकर चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला असून नरसाळे यांच्यावर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच दुसरा कामगार मयत झाला. दरम्यान दोन्ही कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कारखाना परिसर व कामगार वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.