ईतर

अभिजित पाटील यांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरून विरोधकांना दिले करडे आव्हान

अभिजीत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात वारसदार म्हणून किती दिवस लोकांना फसवणार?

संपादक-दिनेश खंडेलवाल

माझ्याकडे कारखाना नाही आला तर मी सांगोल्याला ऊस घालेन तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये नेणार का?

निवडणुक प्रचारात तुमची १९३ पाने वाचणार   आहे. 

पंढरपूर : पंढरपूर तालुक्याची अर्थदायीनी म्हणून संबोधले जाणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधकांना करडे आवाहन दिले आहे.

विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनल उभे करून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांना व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्याचबरोबर विठ्ठल कारखाना पुन्हा एकदा महाराष्ट्रात नंबर एक ने आणण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थित जनसमुदायाने मोठा जल्लोष केला.

विठ्ठलची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी व विरोधी गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विठ्ठल कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.

शहरातील शिवतीर्थावर आज वारकरी वेशात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढली होती. बैलगाडीतून वारकरी वेशात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान शिवतीर्थावर जमलेल्या लोकांना संबोधित करताना सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले आहेत. तुम्ही अमुक अमक्याचा मुलगा, तमुक व्यक्तीचा नातू म्हणून सगळ्यांना आपला वारसा सांगत आहात तर दुसरीकडे कारखाना बंद पाडून शेतकरी कामगार व सभासदांना फसवत आहात. विठ्ठलची निवडणूक ही विकासावर लढायला हवी ती तुम्ही वारसावर लढत आहात.

तुम्ही माझ्या काही जवळच्या लोकांना आणि शेतकऱ्यांना भीती घालत आहात की ह्यांच्याकडे कारखाना नाही आला तर उसाचं काय करणार?आम्हाला कारखाना नाही आला तर आम्ही सांगोला कारखान्याकडे ऊस नेऊ पण तुमच्याकडे नाही आला तर तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये नेणार का? असा घणाघात युवराज पाटील यांचे न घेता त्यांनी केला.

निवडणूकीत तुमच्यावर बोलायला मी १९३ पाने लिहिली आहेत रोज एक एक पान वाचून दाखवेन आणि तुमचा भ्रष्टाचार उघडा पाडेन असा सूचक इशाराही त्यांनी दिला. सोबतच “तुमच्या दारावर सत्ताधारी मतासाठी आले तर त्यांनी १०९ कोटींचा हिशोब मागा,विठ्ठलचा प्रत्येक सभासद म्हणजेच विठ्ठल परिवार आहे. माझ्याकडे कारखाना आला तर पुन्हा एकदा विठ्ठल कारखाना महाराष्ट्रात नंबर 1 ने आणून दाखवेण तसेच जिल्ह्यात सगळ्या कारखान्यांपेक्षा ५० रुपये ज्यादा दर देईन असेही त्यांनी यावेळी घोषित केले. विठ्ठल कारखाना सभासदांचा वाढता पाठिंबा आणि संख्या पाहता विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close