ईतर

सावधान ओमायक्रोनचे ८७ रुग्ण- महाराष्ट्र ठरतोय ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट ‘ही’ लक्षणं दिसल्यास सावध व्हा

एकाच दिवसात सापडले १४ नवे रुग्ण पहा

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटने जगभरात धूमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. दरम्यान देशातील रुग्णांची संख्या ही ८७ वर पोहोचली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

देशात गुरुवारी एकाच दिवसात ओमायक्रॉनचे नवे १४ रुग्ण आढळून आले. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरियंट आढळून आल्यानंतर एक महिन्याहून कमी कालावधीत ८० देशांमध्ये तो पसरला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. ही रुग्ण कुठे आहेत.

ओमायक्रॉनची लक्षणे काय आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेऊया

ओमायक्रॉनच्या लक्षणाबाबत सांगायचं झाल्यास या संसर्गाची लक्षणे कोरोनाच्या आधीच्या व्हेरियंटपेक्षा थोडी वेगळी आहेत. काहीसा घसा खवखवणे आणि अंगावर काटे येणे, थकवा, अंगदुखी आणि हलका ताप ही ओमिक्रॉन संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत. कुठल्याही गोष्टीचा वास जाणवत नाही, असे रुग्ण अद्याप भारतात आढळून आलेले नाहीत. घसा खवखवणे, थकवा येणे आणि अंग दुखणे ही लक्षणे बहुतांश रुग्णांमध्ये दिसतात. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणंच दिसली नाहीत.

चिंताजनक बाब म्हणजे जे रुग्ण आधी कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉन संसर्ग होत असल्याचं समोर आले आहे. सध्याच्या लसी याला प्रतिबंध करण्यासाठी कमी प्रभावी ठरत आहेत. एस्ट्रा झेनिका लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर ६ महिन्यांनी ओमायक्रोन चा संसर्गापासून संरक्षण होत नाही असे ब्रिटनमध्ये एका संशोधनात दिसून आले आहे.

दरम्यान नव्याने आढळून आलेल्या १४ रुग्णांमध्ये कर्नाटकातील ५, दिल्ली आणि तेलंगणातील प्रत्येकी ४ आणि गुजरातमधील एका नवीन रुग्णाचा समावेश आहे. अशा प्रकारे, देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या ८७ वर गेली आहे. ओमायक्रॉनचे आतापर्यंत महाराष्ट्रात ३२, राजस्थान १७, दिल्ली १०, गुजरात ६, केरळ ४,कर्नाटक ८, तेलंगण ६, आंध्र प्रदेश, चंदीगड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत प्रत्येकी १-१ रुग्ण आढळून आले आहे. यापैकी अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-               दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close