पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष हमीद बागवान यांचे अल्पशा आजाराने निधन
समाज सेवक हरपला;अनेकांनी केली हळहळ व्यक्त
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष हमीद बागवान यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे दुःखद निधन झाले. समाजातील मुस्लिम बांधवांचे विविध प्रश्नावर पुढाकार घेऊन सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्यामुळे
त्यांच्या निधनामुळे मुस्लीम समाजात अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे. अठरा पगड जातींना घेऊन जाणारा एक नेता व समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावणारा नेता हरपला. प्रभागांमध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्या बरोबर विकासाची कामे करण्यावर त्यांनी नेहमीच प्रयत्न केला होता.आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी सर्वांशी सलोखा राखून कामे करून घेण्यात त्यांची हातोटी होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दांत अनेकांनी श्रध्दांजली वाहीली.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com