ईतर

पंढरीत आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी दिली नवजीवन बाल रुग्णालयास भेट

ईश्वर सेवा हेच रुग्ण सेवा मानणाऱ्या डॉ. शितल के शहा यांच्याशी केला विशेष संवाद

मुख्य संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरीत आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी दिली नवजीवन बाल रुग्णालयास भेट

ईश्वर सेवा हेच रुग्ण सेवा मानणाऱ्या डॉ. शितल के शहा यांच्याशी केला विशेष संवाद

पंढरपूर(प्रतिनिधी):- तमाम वारकरी संप्रदायाचे व राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरी नगरीत आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरातील नवजीवन बाल रुग्णालय या डॉक्टर शितल के शहा यांच्या रुग्णालयास अचानक भेट देऊन पाहणी केली.
यावेळी ईश्वर सेवा हीच रुग्णसेवा मानणाऱ्या डॉ शितल शहा यांच्या साठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानाचा ठरला कारण आरोग्य मंत्री आबिटकर यांनी रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली आणि रुग्णसेवेचा आढावा घेतला.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अचानक आगमनाने रुग्णालयातील संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले. डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी आणि रुग्णांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर शितल के शहा यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांच्यासोबत माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश नाना साठे, डॉक्टर सुधीर आसबे, डॉक्टर रविराज भोसले तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. शितल शहा यांच्याशी विशेष संवाद…

यावेळी मंत्री महोदयांनी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शितल शहा यांच्याशी विशेष संवाद साधला. रुग्णालयातील आधुनिक सुविधा, रुग्णांसाठी उपलब्ध असणाऱ्या सेवा, गरीब व गरजू रुग्णांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना आणि भविष्यातील विस्तार याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

डॉ. शितल शहा यांनी रुग्णालयाकडून सुरू असलेल्या आरोग्य सेवांची माहिती देताना सांगितले की, “आमचा उद्देश फक्त उपचार नाही, तर प्रत्येक रुग्णाला प्रेमळ आणि परवडणारी सेवा देणे आहे. विठ्ठल नगरीतील एकही रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहू नये, हेच आमचे ध्येय आहे.”

यावर मंत्री आबिटकर जी यांनी समाधान व्यक्त करत रुग्णालयाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

मंत्री आबिटकर म्हणाले…

_”पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात असे दर्जेदार रुग्णालय असणे ही भाग्याची गोष्ट आहे. डॉ. शितल शहा यांच्या नेतृत्वाखाली इथे होणारी रुग्णसेवा खरंच कौतुकास्पद आहे. शासन म्हणून आम्ही अशा रुग्णालयांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहू,”_ असे गौरवोद्गार मंत्री महोदयांनी काढले.

त्यांनी रुग्णालयातील वॉर्ड, ओपीडी विभाग, आणि इतर सुविधांची पाहणी केली आणि रुग्णांशीही आपुलकीने संवाद साधला.

या भेटीमुळे रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, यापुढेही अधिक जोमाने रुग्णसेवा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close