सोलापूर पुणे हायवेवर भरधाव टाटाकारने दिली मोटार सायकलला पाठिमागुन धडक एक ठार तीन जखमी
अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यु;कार मधील तिघे जखमी

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल अपघातातील मयत
राजेश शिंदे : मोहोळ
भरधाव वेगाने निघालेल्या टाटा कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला तर कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात 25 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता यावली ता. मोहोळ गावच्या शिवारातील अनगर फाटया जवळ झाला. यासीन बाबुलाल कमलीवाले ( वय 24 वर्ष , रा . जवाहर नगर, पाथरूट चौक सोलापूर ) असे मोटरसायकल चालक मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जवाहर नगर सोलापूर येथील यासीन बाबूलाल कमलीवाले हे शेळ्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवार ता 25 डिसेंबर रोजी ते शेळ्या खरेदी विक्री करण्यासाठी अनगर ता. मोहोळ येथील आठवडी बाजारात गेले होते. सकाळी साडेनऊ वाजता ते मोटरसायकल क्र. (एम.एच .13 . डी.के. 5643) वरून परत सोलापूरकडे येत होते. त्यावेळी यावली गावच्या शिवारात पुण्याहून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या टाटा कार क्र. (आर.जे. 14. यु.एफ. 6937) या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक ऐवढी जोरात होती की दुचाकीस्वार 15 ते 20 फुट उंच उडाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. तर कार चालकासह अन्य एक पुरुष व दोन महिला गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी जखमींना पुढील उपचारासाठी शिवाजी सर्वोउपचार रुग्णालय सोलापूर येथे पाठवून दिले.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com