पंढरपूरमध्ये शनिवारी ‘डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल’ चे उदघाटन
स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे यांची माहिती
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : येथील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या तुळशी वृंदावनजवळ शनिवार, दि.०८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता ‘डॉ. बी.पी. रोंगे हॉस्पिटल’चे उदघाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते व माढा मतदार संघाचे लोकसभेचे सदस्य खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती या हॉस्पिटलच्या प्रमुख व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे यांनी दिली.
पुण्याच्या प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि ग्रामीण भागातील अनुभव घेत असतानाच शहरी भागातील रुग्णांना सेवा देण्याच्या हेतूने डॉ.स्नेहा रोंगे यांनी पंढरपूर शहरात पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणीनुसार पंढरपूर शहरात ‘डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल’ सुरु केले असून शनिवारपासून ग्रामीण बरोबरच शहरी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी त्या सज्ज असणार आहेत. डॉ. स्नेहा रोंगे या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ असून ‘आपलं आरोग्य व आपला विश्वास’ या धर्तीवर सेवा देण्यासाठी हा दवाखाना सज्ज असणार आहे. डॉ. स्नेहा रोंगे ह्या स्वतः एमबीबीएस, एमएस (ओबीजीवाय)असून त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले आहे.
या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपी एक्सपर्ट व इन्फर्टीलिटी स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉ.स्नेहा रोंगे यांची सेवा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागामध्ये सहसा कोणताही आजार झाला तर त्या रुग्णांना मोठमोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागते आणि वेळेअभावी योग्य उपचार घेण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे रुग्णाची प्रचंड धावपळ होते. हे लक्षात घेऊन मोठ्या शहराऐवजी पंढरपूर मध्येच या हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. स्नेहा रोंगे ह्या संपूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहेत. विशेष करून महिलांच्या प्रसूतीसाठी या क्लिनिक मध्ये प्राथमिक स्वरूपात उपचार केले जाणार आहेत. नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, जोखमीची गर्भावस्था, वेदनारहित डिलिव्हरी, गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन (टाक्याचे/ दुर्बिणीद्वारे), गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन, कॉपर-टी, गर्भपात, गर्भधारणेसाठी समुपदेशन, गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन, नळीचे बंधन टाक्याचे/ दुर्बिणीद्वारे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज उपचार, लसीकरण, विवाहपूर्व समुपदेशन अशा सुविधा उपलब्ध आहेत. तसेच विशेष सुविधामध्ये दुर्बिणीद्वारे तपासणी व उपचार, गर्भाशयाच्या आतील भाग पाहण्याची दुर्बिण, स्त्रियांमधील मुत्रशास्त्र, कॅन्सरचं निराकरण करण्यासाठी चाचणी, वंध्यत्व आणि उपचार, रजोनिवृत्ती, समुपदेशन आदी विशेष सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत.
‘डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल’ च्या माध्यमातून स्त्री रुग्णांवर प्राथमिक उपचाराची सोय झाल्यामुळे पंढरपूर पंचक्रोशीत समाधानाचे वातावरण पसरले आहे. ‘डॉ. बी.पी. रोंगे हॉस्पिटल’च्या उदघाटन प्रसंगी सांगोला मतदार संघाचे आमदार अॅड. शहाजी पाटील, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे मुख्य अतिथी उपस्थित राहणार आहेत तसेच पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ. साधनाताई भोसले, दैनिक पंढरी संचारचे संस्थापक बाळासाहेब बडवे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, डॉ.प्रमोद पवार, डॉ.पंकज गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, पंढरपूर निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.किशोर बागडे, स्वेरीचे संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे हे अतिथी म्हणून लाभले आहेत. या उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ अभंगराव, मनसेचे दिलीप धोत्रे, सुधाकरपंत परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन नागेश भोसले, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, आरपीआयचे सुनील सर्वगोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले, पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपुरचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पंढरपूर नोटरीचे अॅड. यासिन शेख, डॉ.संभाजी पाचकवडे, डॉ.सुजाता गुंडेवार, डॉ. शितल शहा, डॉ. हरिश्चंद्र भाकरे, डॉ. आरीफ बोहरी, डॉ.संजय देशमुख, डॉ.श्रीकांत देवकते, डॉ. विजयसिंह देशमुख, डॉ. संदीप गवळी, डॉ.सुरज रुपनर आदी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. ‘डॉ.बी.पी.रोंगे हॉस्पिटल’चा उदघाटन सोहळा हा कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करून संपन्न होणार आहे. कोविड-१९ मुळे इच्छा असूनही अनेकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. त्यांच्यासाठी http://www.facebook.com?DBPHRH फेसबुक लिंकद्वारे उदघाटन सोहळा पाहण्याची सोय केली आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास ऑनलाईन उपास्थित राहावे असे आवाहन स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे व सौ. अलका हणमंत बागल यांनी केले आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com