राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना २४ तासात जीवे मारण्याची धमकी!
राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफिसमध्येच एका अज्ञाताने केला फोन!

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या फोन कॉलमुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिलेल्या धमकीचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोणी आणी कशासाठी जीवे मारण्याची धमकी दिली हे मात्र तपासा अंतीच समजणार असले तरी या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या महीला पदाधिकारी व कार्यकर्त्या मधून तर्क वितर्क लावले जात असल्याचे समजते.
[ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना त्यांच्या ऑफिसमध्ये दुपारी एक ते तीनच्या दरम्यान मोबाईल वरून फोन आला होता. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ही बाब फार गंभीर असून सदरचा फोन अहमदनगर जिल्ह्याच्या परिसरातून आला असल्याची माहिती सूत्रां कडून पुढे येत आहे.]
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा कारभार स्वीकारल्यानंतर अनेक चांगली कामे केली आहेत. राज्यात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडींवर रुपाली चाकणकर यांनी ताबडतोब दखल घेतलेली आहे. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा फोन कॉल आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याआधीही रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले आहेत.
दरम्यान रुपाली चाकणकर या महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचे महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.
त्यांच्या कामाची तत्परता व ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अन्याय झाले त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी दाखवलेली धडाडी यामुळे तर त्यांना फोन आला नसेल ना? असे ही बोलले जात आहे. मात्र चांगले काम करताना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याने राष्ट्रवादी महिला गोटात एकच खळबळ उडाली