पोलीस उपनिरीक्षक अब्दुल हमीद याकुब शेख यांचा “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” देऊन गौरव
पोलीस सेवेतील प्रशंसनीय कार्यासाठी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते केले प्रदान

संपादक दिनेश खंडेलवाल
पोलीस उप निरीक्षक अब्दुल हमीद याकुब शेख यांचा “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” देऊन गौरव
पोलीस सेवेतील प्रशंसनीय कार्यासाठी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते केले प्रदान
पंढरपूर : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. अब्दुल हमीद याकुब शेख सोलापूर ग्रामीण यांना प्रशंसनीय सेवेसाठी “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह”
देऊन सोलापूर येथे नुकतेच गौरवण्यात आले त्यांच्या या कार्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे झालेल्या बैठकीमध्ये पंढरपूर येथील पोलीस उपनिरीक्षक अब्दुल हमीद याकुब शेख यांना प्रशंसनीय सेवेसाठी “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह”
प्रदान करण्यात आले. सदरचे सन्मानचिन्ह राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या उपस्थितीत
सोलापूर येथे गुन्हे शाखेच्या बैठकीत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल व प्रशंसनीय सेवेसाठी अब्दुल हमीद शेख यांचा गौरव करण्यात आला यामुळे पंढरपूर शहर पोलिस, तालुका पोलिस व ग्रामीण पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आनंद व्यक्त करत पुढील कारकीर्द यशस्वी घडावी यासाठी शुभेच्छा दिल्या.