जि.प.प्रा.शाळा अनवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
विराज भैया आवताडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप

संपादक-दिनेश खंडेलवाल
जि.प.प्रा.शाळा अनवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
विराज भैया आवताडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप
पंढरपूर: आमदार समाधान दादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या सोबतच वह्या वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसा निमित्ताने जि.प.प्रा.शाळा अनवली येथे विद्यार्थ्यांची गरज ओळखत त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी शैक्षणिक साहित्य म्हणून विराज भैया आवताडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी आमदार समाधानदादा आवताडे यांच्या कार्याची ओळख सर्वांना करून देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांचे चिरंजीव विराज भैया आवताडे यांनी अनवली ग्रामपंचायतचे सरपंच मिस्टर गजेंद्र शिंदे , उपसरपंच वासुदेव खुणे , पत्रकार अमीन शेख सचिन शिंदे , राहुल शिंदे , नवनाथ घोडके , मुख्याध्यापक बाबासाहेब दराडे, शिक्षक सतीश पाटील,रवींद्र देशमुख, अवधूत गायकवाड, मकरंद रणदिवे, शिक्षिका मनीषा म्हमाने, राजश्री माने व विद्यार्थी आदी उपस्थित होते.