शैक्षणिक

पंढरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत मातोश्री सौ.सरुबाई माने विद्यालयाची गरुड भरारी

१७ वर्षे वयोगटातील मुलांची आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत मातोश्री सौ.सरुबाई माने विद्यालयाची गरुड भरारी

१७ वर्षे वयोगटातील मुलांची आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथील सौ सरुबाई माने महाविद्यालयातील १७ वर्षे वयोगटातील मुलांची आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत उत्तुंग भरारी घेतली असून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत पंढरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत मातोश्री सौ.सरुबाई माने विद्यालयाने गरुड भरारी घेतली आहे.

पंढरपूर तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा लोटस पब्लिक स्कूल कासेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या. सदर स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील शालेय क्रिडा स्पर्धांत कायमच उल्लेखनीय प्रदर्शन करणार्या मातोश्री सौ.सरुबाई माने विद्यालय व कला शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय तसेच मातोश्री गुरुकुल भटुंबरे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १७ वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी गटातून पंढरपूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला.

या विजया बद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड.वामनराव माने सर, संस्थेचे सचिव प्रा.सुभाषराव माने सर, प्राचार्य उत्तमराव कोकरे, संस्थेचे संचालक विक्रमसिंह माने सर यांनी अभिनंदन करुन जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

मातोश्री सौ. सरुबाई माने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयातील
क्रिडा शिक्षक सर्वश्री सुभाष हेगडे सर, सुरज लोंढे सर,अंकुश कारंडे सर,अजयनाना खांडेकर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व परिश्रम घेतल्यानेच तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी घेतली.
यानंतर क्रीडांगणावरच विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा करत मातोश्री सौ सरूबाई माने महाविद्यालयाचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला.

या वेळी नाना मदने सर,प्रा.अमरसिंह खांडेकर सर,प्रा.राजुरी सर, प्रा.नवनाथ देवकते सर व सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. सर्वांनी महाविद्यालयातील मुलांचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरावरील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close