झारखंड सरकारने सम्मेद शिखरजी या जैन तिर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करताच पंढरीत पडसाद;सकल जैन धर्माचा पर्यटन स्थळाला विरोध
सकल जैन समाज पंढरपूर तालुका व शहर यांच्यावतीने तहसीलवर निषेध मुकमोर्चा

संपादक-दिनेश खंडेलवाल
झारखंड सरकारने सम्मेद शिखरजी या जैन तिर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करताच पंढरीत पडसाद;सकल जैन धर्माचा पर्यटन स्थळाला विरोध
सकल जैन समाज पंढरपूर तालुका व शहर यांच्यावतीने तहसीलवर निषेध मुकमोर्चा
पंढरपूर : सकल जैन समाज पंढरपूर तालुका व शहर यांच्यावतीने तहसिलवर निषेध मुकमोर्चा काढण्यात आला होता.
झारखंड सरकारने सम्मेद शिखरजी हे तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यास देशातील सकल जैन समाजाने विरोध करत निर्णयाचा निषेध केला आहे. दरम्यान बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी संपूर्ण भारतात बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त पंढरपूरातील सकल जैन समाजाने आपआपले व्यवसाय बंद पाळुन निषेध व्यक्त करत मुकमोर्चा काढण्यात आला होता.
झारखंड सरकारने सम्मेद शिखरजी या जैन तिर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे. या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर सकल जैन समाजाने आज दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता फडे दिगंबर जैन मंदिर येथून निषेध मुकमोर्चाचे आयोजन केले होते.
पंढरपूर तहसील कार्यालयात डेप्युटी कलेक्टर समाधान गोटुकडे यांना पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल जैन समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार , पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महावीर नगर,श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वीरसागरनगर,त्रिलोक तीर्थक्षेत्र शेगांव दुमाला चे पदाधिकारी,पद्मावती महिला मंडळ, सुमन श्री महिला मंडळ, क्रांती महिला मंडळ, सिध्दश्री महिला मंडळ, युनिकक्रांती महिला मंडळ, स्वयंसिध्दा महिला मंडळ, स्वानभुती महिला मंडळ, शुभश्री महिला मंडळ,जैन सोशल ग्रुप,सन्मती सेवा दल, महावीर युवा सेना,जैन चॅरिटेबल ट्रस्ट,जैन युवा फेडरेशन,जैनवाडी, देगाव,पेणूर,पाटकूल, करकंब,कौठाळी,सरकोली येथील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.