सामाजिक

पंढरीचा सलमान रस्त्यावर जगत असलेल्या अनेक मनोरुग्णांना दाखवतोय घरापर्यंतची वाट

स्वखर्चाने समाजसेवा करणारा पंढरीचा अवलीया युवक ठरला आहे आदर्श

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरीचा सलमान रस्त्यावर जगत असलेल्या अनेक मनोरुग्णांना दाखवतोय घरापर्यंतची वाट

स्वखर्चाने समाजसेवा करणारा पंढरीचा अवलीया युवक ठरला आहे आदर्श

पंढरपूर : दक्षिण महाराष्ट्राची काशी तसेच संत भूमी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या तीर्थक्षेत्र पंढरीच्या रस्त्यावर आणि परिसरामध्ये अनेक व्यक्ती डोक्यावर वाढलेले केस, अंगावर मळलेले कपडे, त्यांच्यातील विक्षिप्त पणा, मिळेल ते अन्न खाऊन जीवन जगणारे व संस्सार सुखापासून दुरावलेले निराधार,अनाथ, बेघर,बेवारस,मनोरुग्ण
पाहायला मिळतील परंतु या मनोरुग्णांची घरच्या माणसाप्रमाणे काळजी घेणारा पंढरीचा अवलिया युवक सलमानचा आदर्श घेण्याजोगा आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये वर्षाकाठी चार यात्रा भरत असतात अशा यात्रेमध्ये आपल्या घरातील मनोरुग्ण वृद्ध व्यक्तींना यात्रेमध्ये सोडून जाणारे अनेक महाभाग आहेत तर काहीजण हरवलेले असताना घरची वाट न मिळाल्याने रस्त्याच्या कडेला गुजरान करतात अशा व्यक्तींची काळजी घेणारा पंढरीचा सलमान अशा मनोरुग्णांची सेवा स्वखर्चाने करत असून त्यांच्या निवाऱ्यासाठी झटताना दिसत आहे.

डोक्यावर वाढलेले केस अंगावर मळलेले कपडे मिळेल ते अन्न खाऊन जीवन जगणारे व संस्सार सुखापासून दुरावलेले रस्त्यावरील निराधार,अनाथ,बेघर, बेवारस,मनोरुग्ण यांना मायेचा आधार देण्यासाठी सलमान भाई आतार या युवकांची धडपड सोलापूर जिल्हत सुरू आहे.आतापर्यंत त्याने रस्त्यावर जिवन जगत असलेल्या बर्याच व्यक्तींना त्याच्या घराचा मार्ग दाखवत त्यांच्या माणसांमध्ये घरी पाठवले आहे.

मनोरुग्णांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी सलमान भाई आतार याने “बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था” स्थापन केली व “माणूस म्हणून एक हात मदतीचा” हे ब्रिद वाक्य मनात जोपासून ह्या तरूणाने अनेक मनोरुग्णांचे वाढलेले केस कापने व त्यांना अंघोळ घालने, त्यांना नवीन कपडे देणे, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे देणे, त्यांना पोटभरून जेवण देत त्यांच्या हाताच्या बोटांच्या ठशावरून व सोशल मिडियाचा वापर करून अशा व्यक्तींना त्याच्या घरचा पत्ता व कुटुंबाचा शोध घेऊन घरी पोहचवने हे काम सलमान भाई आतार करत आहेत.

सलमान भाई हे मेडिकल व्यवसाय करताना आयुष्यभर दुर्गंधीचे जीवन जगणाऱ्या मनोरुग्णाची दुर्गंधी साफ करून त्याच्या जिवनात सुगंध आणण्याचे सामाजिक काम ते करताना सतत दिसत असतात.

[मायेची सावली अन् निवारा उभारण्याचे काम घेतले हाती——————-

सोलापूर जिल्ह्य़ातील व पंढरपूर तालुक्यातील रस्त्यावरील निराधार अनाथ, बेघर,बेवारस, मनोरुग्ण यांना मायेची सावली अन् निवारा मिळावा या साठी सलमानची धडपड सूरू आहे.
यासाठी लागणारी जागा व पञा शेड उभा करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. सदर कामासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे व माणूस म्हणून एक हात मदतीचा द्यावा असे आवाहन व विनंती त्यांनी केली आहे.] (सलमान मोबाईल क्रमांक ९६६५५८८४२३)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close