सामाजिक

कॅन्सर ची लक्षणे “भिऊ नका” सर्वांसाठी मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर

या शिबिरात पॅप स्मिअर टेस्ट करणार व आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून मिळणार

संपादक-दिनेश खंडेलवाल

कॅन्सर ची लक्षणे “भिऊ नका” सर्वांसाठी मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर

या शिबिरात पॅप स्मिअर टेस्ट करणार व आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून मिळणार

पंढरपूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरांमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या डॉक्टर काणेज् गायत्री सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल व श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांसाठी मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर त्याचबरोबर या शिबिरामध्ये महीलांची पॅप स्मिअर टेस्ट केली जाणार असून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपले लिंक असलेले आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक घेऊन आल्यास त्यांना आयुष्यमान भारत कार्डही मोफत काढून मिळणार आहे अशी माहिती डॉक्टर वर्षा काणे व डॉक्टर सुरेंद्र काणे यांनी दिली.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना,भारत विकास परिषद,डॉक्टर काणे मेडिकल असोसिएशन पंढरपूर व श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर यांच्या विद्यमाने मोफत मार्गदर्शन तसेच कॅन्सर रोग निदान शिबिर आयोजित केले आहे. याचा शहर व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

ज्या व्यक्तींना किंवा रुग्णांना ओठ, जीभ, जननेंद्रिय व कातडी या ठिकाणी न भरून येणारी जखम तसेच स्त्रियांना स्तन,गळा,चामडी कोठेही असणारी गाठ, कुठूनही होणारा अनियमित रक्तस्त्राव, नाक,थुंकी, उलटी,लाल पांढरा पदर जाणे,रक्त,शौच वगैरे अन्न गिळताना अडकणे,भूक मंदावणे,वजन घटने,उलटी होणे,संडास व लघवी यांच्या सवयीत बदल होणे, आवाजात बदल,सतत खोकला येणे,तीळ, चामखीळ यात बदल होणे, अगर चिघळणे अशा विविध प्रकारची लक्षणे दिसून आल्यास अशा रुग्णांनी मोफत कॅन्सर रोग निदान शिबिराचा लाभ घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेळीच तपासणी केल्यास असाध्य असा असणारा कॅन्सर रोगावरही उपचार करता येतो.

यामुळे कोणीही भिऊन जाऊ नये ज्या व्यक्तींना वीडी,सिगारेट, तंबाखू व दारूचे सेवन करण्याची सवय असेल अशा व्यक्ती कर्करोगास म्हणजेच कॅन्सरला आमंत्रण देतात. अशा सर्व प्रकारची लक्षणे दिसून येणार्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी होणारे मोफत कॅन्सर रोग निदान शिबिरात आपली तपासणी करून घ्यावी व कॅन्सर पासून कशा पद्धतीने बचाव करता येतो याचे मोलाचे मार्गदर्शन समजून घ्यावे अशी माहिती काणे डॉक्टरांनी दिली.

सदरचे शिबिर हे नवीन कराडनाका कराड रोड येथील डॉक्टर काणेज् गायत्री सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल येथे आयोजित केले असून सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या शिबिरामध्ये रोग निदान केले जाणार आहे.

सदर माहिती देताना काणे सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे स्टाफ,विश्वास पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close