भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या एलईडी फलकाचे अनावरण

संपादक- दिनेश खंडेलवाल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या एलईडी फलकाचे अनावरण
संजय बाबा ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल काळुखे यांच्या सौजन्याने उभारण्यात आला फलक
पंढरपूर : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक एल ई डी फलकाचे अनावरण आज सामाजिक कार्यकर्ते संजय बाबा ननवरे व राहुल काळुखे यांच्या उपस्थितीत युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर पंढरपूर शहराच्या वैभवात भर टाकणारे एलईडी ऍक्रेलिक चे आकर्षक असे हे फलक असून यामुळे या चौकालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव देण्यात आल्याचे प्रणव परिचारक यांनी जाहीर केले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या फलकाचे अनावरण करताना मनस्वी आनंद होत आहे. खरोखर हा स्तुत्य उपक्रम असून बाबासाहेबांच्या स्मारकाला नतमस्तक होताना हे फलक दिसत असल्याने या चौकाला खऱ्या अर्थाने ओळख व्हावी यासाठी केलेले कार्य हे समाज उपयोगी असून कौतुकास्पद आहे. अशी प्रतिक्रिया युवक नेते प्रणव परिचारक यांनी बोलताना व्यक्त केली.
सदर प्रसंगी गणेश कांबळे, रवि उघडे,समाधान कांबळे, सूरज ननवरे,गणेश काळूखे, बापू उघडे, आदित्य छापछडी, धीरज सोनवणे, अनिकेत मेटकरी, सोनू जाधव, पपू जाधव, अभिषेक ननवरे, ओम ननवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
[ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्यानंतरच सदर ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव देण्याचे मनामध्ये आले. परंतु फलक लावण्यासाठी रीतसर परवानगी आणि नोंदणी करणे गरजेचे असल्याने हे फलक लावण्यात उशीर झालाय. फलक लावण्यासाठी नोंदणी आणि मंजुरी मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंतीचे औचित्य साधून माझ्या मार्गदर्शनाखाली सुरज काळुखे याच्या सौजन्याने हे फलक लावण्यात आले असून या फलकामुळे खरोखरच पंढरीच्या वैभवात भर पडणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संजय बाबा ननवरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ]