पंढरपुरात कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक नावाने सहकार अध्यासन केंद्र उभारणार- प्रणव परिचारक
पंढरपूरच्या उमा महाविद्यालयात उभारणार सहकार अध्यासन केंद्र

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपुरात कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक नावाने सहकार अध्यासन केंद्र उभारणार- प्रणव परिचारक
पंढरपूरच्या उमा महाविद्यालयात उभारणार सहकार अध्यासन केंद्र
पंढरपूर :- पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पंढरपूरच्या उमा महाविद्यालयात कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक सहकार अध्यासन केंद्र या नावाने नवे सहकार व्यासपीठ जीवन कौशल्य विकास अंतर्गत सुरुवात करण्यात येणार आहे. हे केंद्र निर्माण करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे अशी माहिती पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रणव परिचारक यांनी दिली.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या विचाराचा वारसा अविरत चालू ठेवणे सहकार संस्था यांना बळकटी देणे यासाठी पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य मिलिंद परिचारक सर. संस्थेचे मार्गदर्शक उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विश्वस्त मंडळाचे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकार अध्यासन केंद्र निर्माण करण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच पंढरपुरात उमा महाविद्यालयाच्या प्रांगणात सहकार अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे. हे सहकार अध्यासन केंद्र महाराष्ट्रातील पहिलेच असावे असा विश्वास यावेळी विश्वस्त प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला.
कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक सहकार अध्यासन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरातील सहकारी संस्थांना बळकटी देणे, सहकारामधील नवे संशोधन करणे, सहकार वृद्धीसाठी नवे प्रकल्प राबवणे, सहकारी कायदे आणि सहकारातील नवी तंत्रज्ञान नवे प्रवाह याविषयी सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षित करणे, सहकाराची ओळख करून देणारा अभ्यासक्रम सर्व वयोगटातील घटकांसाठी सुरू करणे, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला सहकारी संस्था उभा करणे, केंद्र व राज्य सरकारच्या नव्या सहकारी कायदे व योजनांची माहिती जनतेला करून देणे, अशा विविध अजेंड्यांवर हे सहकार अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे सहकाराला एक नवी उंची प्राप्त करून देण्याचे काम पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून होताना दिसेल.
कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक तोट्यातील सहकारी संस्था फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न केले खाजगी कारखाना घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखाना उभा केला. भीमा आणि दामाजी सारखे सहकारी साखर कारखाने जे तोट्यात निघाले होते. त्याला नवीन झळाळी देण्याचे काम सुधाकरपंत परिचारक यांनी केले ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती बँक, दूध संघ, कारखाने, बँका, गृहनिर्माण संस्था अशा विविध सहकारी संस्थांमध्ये सुधाकरपंत परिचारक हे मार्गदर्शक राहिले होत. त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आजच्या नव्या पिढीला करून देण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक सहकार अध्यासन केंद्र हे उभारले जाणार आहे.
- स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी पस्तीस वर्षांपूर्वी पंढरपुरात पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ आणि उमा महाविद्यालयाची स्थापना केली ग्रामीण भागातील मुले शिक्षित झाली पाहिजेत. या हेतूने स्थापना झालेल्या या संस्थेमध्ये आता ग्रामीण भागातील सहकार बळकटीसाठी सहकार अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे. यांचा लाभ विद्यार्थी, सहकार अभ्यासक सहकारी संस्थेतील पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी यांना होणार आहे.
पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या या बैठकीसाठी सर्वश्री अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.