पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड यांचे दुःखद निधन
उद्या सकाळी साडेनऊ वाजता भूवैकूंठ स्मशानभूमी येथे होणार अंत्यसंस्कार

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड यांचे दुःखद निधन
उद्या सकाळी साडेनऊ वाजता भूवैकूंठ स्मशानभूमी येथे होणार अंत्यसंस्कार
पंढरपूर :- पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, पंढरपूर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा माहेश्वरी समाजातील प्रसिद्ध कापड व्यापारी लक्ष्मीनारायण फुलचंद भट्टड यांचे आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान दुःखद निधन झाले.
येथील मारवाडी समाजातील प्रतिथयश व्यक्ती होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर राहून कार्य केले होते.
पंढरपूर माहेश्वरी सभा, डोंगरे महाराज अन्नछत्र, मूकबधिर विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, गोरक्षण यासह अनेक सामाजिक संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले होते. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे ते अत्यंत निकटचे, विश्वासू सहकारी मानले जात होते. पंढरपूर नगरपालिकेचे नगराधयक्ष म्हणून त्यांनी १९९२- ९३ साली काम पाहिले. मृत्यू समयी ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक विवाहित मुलगी,
दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
कै. भट्टड यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता येथील भूवैकूंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.