पंढरीत आलेला वारकरी “विठ्ठल” त्यांच्या आरोग्याची सेवा करण्यातच परमानंद – प्रा.शिवाजीराव सावंत
६५ एकर परिसरातील महाआरोग्य शिबिराचे विविध महाराज मंडळींच्या हस्ते उद्घाटन

संपादक-दिनेश खंडेलवाल
जाहिरात….. जाहिरात….. जाहिरात….
पंढरीत आलेला वारकरी “विठ्ठल” त्यांच्या आरोग्याची सेवा करण्यातच परमानंद – प्रा.शिवाजीराव सावंत
६५ एकर परिसरातील महाआरोग्य शिबिराचे विविध महाराज मंडळींच्या हस्ते उद्घाटन
पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आदी भागाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
या भाविकांना मोफत महाआरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ६५ एकर परिसर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक 22,23 व 24 या कालावधीत करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन विविध महाराज मंडळींच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरून चालत भाविक पंढरपुरात येतात. या भाविकांमध्येच विठ्ठल हा परमेश्वर असून थकून भागून आलेल्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यातच परमानंद असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे चांगले आयोजन केले आहे. याठिकाणी भाविकांना योग्य प्रकारची सेवा मिळावी यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शिवाजी बाबर, मुन्ना भोसले, बागल, सह पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे. भाविकांनी या मोफत महआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यानंतर महाराज मंडळींनी प्रा. शिवाजीराव सावंत यांचा सत्कार करून आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भैरवनाथ शुगर चे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले याच्यांसह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशावर्कर, उपस्थित होते.
या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, डोळ्याची तपासणी व मोफत चष्मे वाटप, हाडांची तपासणी, दंत तपासणी, औषध वितरण, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, ह्दयरोग तपासणी, इसीजी तपासणी केली जात आहे.
महाआरोग्य शिबीरासाठी उच्च तज्ञ डॉक्टर्स उपस्थित असून यात विविध विभागातील मोठमोठ्या रूग्णालयातील हे सर्व तज्ञ डॉक्टर्स आहेत. यांच्याकडून तपासणी, औषधोपचार आणि गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील केली जात आहे.
महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार आणि निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर या शिबिरामध्ये आवश्यक शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, पार्कींग, स्वच्छता गृह, सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
आरोग्य शिबीरात अतिदक्षता विभाग सेंटर 6, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 3, प्राथमिक उपचार केंद्रे – 11, आरोग्य दूत 20, रुग्णवाहिका 7, 24 तास वॉर रूम कार्यरत राहणार असून,शिबीरासाठी 2 हजार 500 आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिबिराला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येते.