भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाईंनी केली – सौ. साधना राऊत
सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा

संपादक-दिनेश खंडेलवाल
भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाईंनी केली – सौ. साधना राऊत
सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा
पंढरपूर :- भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या व महिलांना शिक्षणासाठी न्याय मिळवून देणाऱ्या पहिल्या महिला आद्द क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आपण साजरी करत असून भारतात शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाईंनी केली. यामुळे आज महिला प्रत्येकक्षेत्रात आघाडीवर दिसत आहेत. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी त्यावेळी जाणले होते म्हणूनच आज आणि येणाऱ्या भविष्यातही त्यांचे योगदान विसरता येणार नाही अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्षा सौ. साधना ताई राऊत यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करताना त्या बोलत होत्या.
सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना सौ. राऊत पुढे म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी आणि कार्यामुळे भारतातील कोट्यावधी स्त्रियांचे आयुष्य शिक्षणाच्या तेजाने उजळून निघाले आणि स्त्रिया विकासगंगेच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत.
त्यांच्या या महान कार्याची प्रेरणा आजही आणि पुढील अनेक पिढ्या प्रत्येकाच्या मनात जागृत राहणार यात शंकाच नाही. अनेकांचा विरोध आणि यातना सहन करून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली. आज स्त्रिया शिक्षित झाल्याने उच्च पदावर कार्यरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. देशाच्या राष्ट्रपती सारख्या उच्च पदावर ही स्त्रियांनी काम केले असून सावित्रीबाईंचे योगदान हे विसरता येणार नाही. आज बालिका दिन असून प्रत्येक माता भगिनींनी आपल्या बालिकेला उच्च शिक्षित करावे व शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना उच्च पदस्थ अधिकारी बनवावे. लहानपणापासून संस्कार दिल्यास ते संस्कार शेवटपर्यंत टिकतात असेही सौ साधना राऊत यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी श्रीमती छाया जाधव, तनुजा माने,सौ. प्रतिभा चव्हाण, सुनंदा मोरे-खंडागळे, वैशाली कुलकर्णी, शालन चांडोले, सिंधू माळी, वंदना देवकर, अंजली अवसरे, प्रतिभा अवसरे, इंदुमती गाडेकर, कडूबाई साठे, आकुबाई क्षीरसागर, मंगल राऊत, राधाबाई राऊत, संगीता खिलारे, विद्या राऊत आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.