ईतर

पंढरपूरच्या प्रांताधिकारी पदी सचिन इथापे यांची नियुक्ती

महसूल प्रशासनातील कामाचा होणार पंढरपूरकरांना लाभ

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूरच्या प्रांताधिकारी पदी सचिन इथापे यांची नियुक्ती

महसूल प्रशासनातील कामाचा होणार पंढरपूरकरांना लाभ

पंढरपूर :- लोकसभा सार्वत्रिक त्रिर्डणूका-२०२४
च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी
संवर्गातील अधिकाऱयांची नुकतीच प्रशासनाकडून बदली करण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूर शहराच्या प्रांताधिकारी पदी महसूल प्रशासनाचा दांडगा अभ्यास असलेले नूतन उपविभागीय अधिकारी म्हणून सचिन सुरेश इथापे यांची नियुक्ती झालेली आहे.

त्यांनी शासकीय सेवेमध्ये आपली सुरुवात 26 नोव्हेंबर 2002 पासून
केली असून तहसीलदार म्हणून खानापूर विटा जि.सांगली येथे नोव्हेंबर 2002 ते जून 2007 पर्यंत काम केले.

या नंतर तहसीलदार माण जि.सातारा जून 2007 ते ऑक्टोबर 2008 पर्यंत
तहसीलदार भोर जि.पुणे ऑक्टोबर 2008 ते मे 2012 पर्यंत,तहसीलदार बारामती जि.पुणे मे 2012 ते फेब्रुवारी 2013 पर्यंत काम पाहिले त्यांच्या कामाची जबाबदारी पाहून त्यांना पदोन्नती ने उपजिल्हाधिकारी(महसूल) सांगली,
उपविभागीय अधिकारी विटा, उपविभागीय अधिकारी करवीर, जि.कोल्हापूर येथे कार्यरत होते. यानंतर त्यांना उपमहाव्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळावर नियुक्ती करण्यात आली, उपआयुक्त,पुणे महानगरपालिका येथे कार्यरत होते. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होत आहेत.

            अशी आहे त्यांची कारकीर्द

नागरी सेवा दिनानिमित्त सन २०१३-१४ साठीचा पुणे विभागातून उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून एप्रिल २०१५ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मंत्री (महसूल) यांचे हस्ते पुरस्कार मिळाला. महसूल दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन २०११ साठी पुरस्कार मिळाला आहे.

लोकसभा निवडणूक २००४,२००९,२०१४, २०१९ तर विधानसभा निवडणूक २००४,२००९, २०१४, तसेच
विधान परिषद(शिक्षक पदवीधर मतदार संघ) निवडणूक २००८,२०१४
विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ),
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २००७,२०१२,२०१७
विविध ग्रामपंचायत निवडणुका ,
माणगंगा सहकारी साखर कारखाना,आटपाडी निवडणूक २०१५
दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री ता कागल निवडणूक २०१८ सन २००५,२००६ च्या पूरपरिस्थितीत सांगली शहर,भिलवडी ,अंकलखोप परीसरात मदत व पुनर्वसन कार्य,ऑगस्ट २०१९ च्या पूरपरिस्थिती मध्ये कोल्हापूर येथे मदत व बचाव कार्य,सन २००२-०३,२००१४-१५ चे दुष्काळी परिस्थितीत मदत कामकाज तसेच
सन 2022 .23 सालात पुणे महानगर पालिका विविध पदांची भरती असा कामाचा दांडगा अनुभव असल्याने तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये त्यांच्याकडील कामाच्या अनुभवाचा नक्कीच उपयोग होणार आहे.पंढरपूर शहराच्या प्रांताधिकारी पदी महसूल प्रशासनाचा दांडगा अभ्यास असलेले नूतन उपविभागीय अधिकारी म्हणून सचिन सुरेश इथापे यांची नियुक्ती झालेली आहे.

त्यांनी शासकीय सेवेमध्ये आपली सुरुवात 26 नोव्हेंबर 2002 पासून
केली असून तहसीलदार म्हणून खानापूर विटा जि.सांगली येथे नोव्हेंबर 2002 ते जून 2007 पर्यंत काम केले.

या नंतर तहसीलदार माण जि.सातारा जून 2007 ते ऑक्टोबर 2008 पर्यंत
तहसीलदार भोर जि.पुणे ऑक्टोबर 2008 ते मे 2012 पर्यंत,तहसीलदार बारामती जि.पुणे मे 2012 ते फेब्रुवारी 2013 पर्यंत काम पाहिले त्यांच्या कामाची जबाबदारी पाहून त्यांना पदोन्नती ने उपजिल्हाधिकारी(महसूल) सांगली,
उपविभागीय अधिकारी विटा, उपविभागीय अधिकारी करवीर, जि.कोल्हापूर येथे कार्यरत होते. यानंतर त्यांना उपमहाव्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळावर नियुक्ती करण्यात आली, उपआयुक्त,पुणे महानगरपालिका येथे कार्यरत होते. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होत आहेत.

नागरी सेवा दिनानिमित्त सन २०१३-१४ साठीचा पुणे विभागातून उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून एप्रिल २०१५ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मंत्री (महसूल) यांचे हस्ते पुरस्कार मिळाला. महसूल दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन २०११ साठी पुरस्कार मिळाला आहे.

लोकसभा निवडणूक २००४,२००९,२०१४, २०१९ तर विधानसभा निवडणूक २००४,२००९, २०१४, तसेच
विधान परिषद(शिक्षक पदवीधर मतदार संघ) निवडणूक २००८,२०१४
विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ),
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २००७,२०१२,२०१७
विविध ग्रामपंचायत निवडणुका ,
माणगंगा सहकारी साखर कारखाना,आटपाडी निवडणूक २०१५
दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री ता कागल निवडणूक २०१८ सन २००५,२००६ च्या पूरपरिस्थितीत सांगली शहर,भिलवडी ,अंकलखोप परीसरात मदत व पुनर्वसन कार्य,ऑगस्ट २०१९ च्या पूरपरिस्थिती मध्ये कोल्हापूर येथे मदत व बचाव कार्य,सन २००२-०३,२००१४-१५ चे दुष्काळी परिस्थितीत मदत कामकाज तसेच
सन 2022 .23 सालात पुणे महानगर पालिका विविध पदांची भरती असा कामाचा दांडगा अनुभव असल्याने तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये त्यांच्याकडील कामाच्या अनुभवाचा नक्कीच उपयोग होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close