राजकिय

भाजपच्या व्यूह रचनेत उत्तम जानकर अडकले

फडणवीसांचे आश्वासन उत्तम जानकरांचे सर्व अडचणी सोडवू

संपादक-दिनेश खंडेलवाल

भाजपच्या व्यूह रचनेत उत्तम जानकर अडकले

फडणवीसांचे आश्वासन उत्तम जानकरांचे सर्व अडचणी सोडवू

पंढरपूर :- माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील उत्तम जानकर यांनी
माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारीचे तिकीट मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न भाजपा पक्षश्रेष्ठीकडे केले होते. परंतु या मतदारसंघातील पूर्वीचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामाचा आलेख पाहता भाजपाने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने उत्तमराव जानकर हे नाराज होते.

माढा लोकसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या उलथापालत झाली याच दरम्यान अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांमध्ये प्रवेश घेऊन तुतारी हातात घेत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आणि काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तत्पूर्वी जानकरांनी माध्यमांसमोर सांगितले होते की धनगर समाजाच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आपल्या पाठिंब्यामुळे मोहिते पाटलांना बळ मिळणार आहे. मात्र दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेतो म्हणत खळबळ उडवून दिली होती.

उत्तमराव जानकर हे इतर पक्षात जाऊ नये त्यांची नाराजी कशासाठी होती. हे जाणून घेण्यासाठी आज बारामती हून विशेष विमानाने त्यांना नागपूर येथे बोलवण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, आमदार जयकुमार गोरे आदी मान्यवर गेले होते.

नागपूर येथे उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आदी मान्यवरांसह बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्तमराव जानकर यांनी गेल्या दहा वर्षात अनेक अडचणींचे विषय मांडले आमच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी आपल्यासमोर सविस्तरपणे मांडल्यानंतर त्यावर विश्लेषणात्मक आणि सकारात्मक चर्चा झाली.

त्यामुळे अडचणीचे विषय मार्गी लागणार असल्याने वेळापुरात जाऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे असा शब्द या बैठकीत उत्तमराव जानकर यांनी दिला असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. त्याचबरोबर मी भाजपवर नाराज नाही. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी बोलावून चर्चा केली त्यामुळे आपली नाराजी दूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तमराव जानकर यांनी घेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे महाराष्ट्रा सह सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान माढ्याचे उमेदवार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी उत्तमराव जानकर हे नाराज नसून माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहणार आहेत. सोलापूर येथे उद्या उमेदवारी अर्ज भरायला जाताना ते आमच्या सोबत असतील असा ठाम विश्वास व्यक्त केला व अधिक बोलण्याचे टाळले. मात्र भाजपच्या व्यूहरचनेत उत्तमराव जानकर अडकल्याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होताना दिसत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close