सामाजिक

दोन दिवसात राजकीय निर्णय करणार जाहीर- हनुमंत मोरे

काँग्रेसच्या वरिष्ठांनी राखला नाही मान;पदासोबत सदस्यत्वाचाही दिला होता राजीनामा

संपादक-दिनेश खंडेलवाल 

दोन दिवसात राजकीय निर्णय करणार जाहीर- हनुमंत मोरे

काँग्रेसच्या वरिष्ठांनी राखला नाही मान;पदासोबत सदस्यत्वाचाही दिला होता राजीनामा

पंढरपूर :- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन, काँग्रेसला रामराम ठोकणारे हनुमंत मोरे हे आपला राजकीय निर्णय येत्या दोनच दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनिल बोराडे, ज्ञानेश्वर थिटे,दिलीप कोरके,नितीन व्यवहारे यांची उपस्थित होती.

मागील महिन्यात १५ मार्च रोजी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षाचा शिष्टाचारच वरिष्ठ नेतेमंडळींकडून पाळला जात नाही. या पक्षात आपला स्वाभिमान दुखावला असल्याची खंत हनुमंत मोरे यांनी व्यक्त केली होती. तालुकाध्यक्ष पदाबरोबरच काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला होता. हा राजीनामा काँग्रेस पक्षाकडून अद्याप स्वीकारला गेला नाही. तरीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपली भूमिका, येत्या दोनच दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती हनुमंत मोरे यांनी दिली.

हनुमंत मोरे हे काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते असून काँग्रेसला तळागाळातून वर आणण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले होते. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये त्यांनी आजतागायत जिल्हा सहसचिव, जिल्हा सचिव, माढा तालुका निरीक्षक अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. यावेळी त्यांनी आपल्या कामातून काँग्रेसमध्ये मोठे नाव केले होते. या कामाच्या जोरावरच त्यांची ३० डिसेंबर २०२२ रोजी, पंढरपूरच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली होती.

तालुकाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पक्षासाठी अनेक कार्यक्रम घेऊन धडाका उडवून दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची वरिष्ठ नेते मंडळींकडून निराशा झाली. काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणजे मिनी आमदारच असतो. परंतु या पदाचा सन्मान वरिष्ठ नेते मंडळींनी राखला नाही. परिणामी हनुमंत मोरे हे नाराज झाले. त्यांनी १५ मार्च २०२४ रोजी आपला राजीनामा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्याकडे सादर केला होता. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता.

समाजकार्यातून राजकारणाकडे आलेल्या हनुमंत मोरे यांना महिन्याभरात अनेक नेते मंडळींकडून आपल्या कडे येण्यासाठी गळ घालण्यात आली होती. परंतु त्यांनी कोणालाही शब्द दिला नाही. अखेर राजकारणाच्या प्रवाहात राहण्यासाठी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून, पुढील दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहोत अशी भूमिका हनुमंत मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close