पंढरीत सोनसाखळी चोरणारे आरोपी अटकेत,चार गुन्हे उघड
चोरांकडून १८ तोळे सोने, १२ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
संपादक- दिनेश खंडेलवाल
पंढरीत सोनसाखळी चोरणारे आरोपी अटकेत,चार गुन्हे उघड
चोरांकडून १८ तोळे सोने, १२ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
सोन्याचे चार मंगळसूत्र,एक बोरमाळ व एक चेन मिळून आली
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात महिलांच्या अंगावर चटणी टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या माळशिरस तालुक्यातील दोन आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडून चार गुन्हे उघड झाले आहेत या चारही गुन्ह्यातील सोन्याचे १८ तोळे दागिनेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून या दागीन्यांची अंदाजे किंमत १२ लाख १० हजार असल्याचे माहिती शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेप्रमाणे सोलापूर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करनेच्या आदेशान्वये पंढरपुर विभागाचे सहा पोलीस उपअधिक्षक डॉ अर्जुन भोसले, पंढरपूर शहर वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुरनं ५२५/२०२४ बीएनएस ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक २८/०८/२०२४ रोजी फिर्यादी नामे डॉ. सौ. मैत्रेयी मंदार केसकर वय ४५ वर्षे रा. शाकुंतल नगर, इसबावी, पंढरपूर यांच्या अंगावर चटणी टाकुन त्यांना ढकलुन देवून गळयातील ४४.६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याव्या वाटी असलेले बळजबरीने हिसकावुन तोडून जबरी चोरी करून तेथुन दोन अज्ञात इसम मोटार सायकल वरून निघुन गेले म्हणुन अज्ञात इसमांविरुध्द पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी यांची दोन पथके तयार करून तपास व पेट्रोलिंग करण्या करीता रवाना केली तसेच ट्रॅफिक कर्मचारी यांना नाकाबंदी करून अज्ञात मोटार सायकल वरील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. अज्ञात आरोपीचा व मोटार सायकलचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी स्टेशन रोड ते टाकळी रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयीत इसम मोटार सायकल वरून जात असताना दिसले त्यांना मोटार सायकल थांबविण्यास सांगितले असता ते मोटार सायकल वरून पळून जात असताना पकडले. त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर दोन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता यातील आरोपी विनोद गोविंद पिंपळे रा. उजनी कॉलनी, श्रीपुर ता. माळशिरस याचे जरकीन मध्ये गुन्हयातील गेला माल ३,३१,०२६/-रू.चे एक ४४. ६६० ग्रॅम वजनाचे फिर्यादीचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याच्या वाटी, अर्धी अंबारी कंपनीची लाल चटणीची पुडी मिळून आली. दुसरा आरोपी महादेव शंकर पवार रा. श्रीपुर ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी गुन्हा करताना वापरलेली होन्डा कंपनीची युनीकॉर्न मॉडेलची बिना नंबर असलेली मोटार सायकल असा मुद्देमाल त्यांचेकडे मिळाल्याने तो गुन्हयाचे तपासात जप्त केला. त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ४ गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने त्या ४ गुन्हयांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपींनी गुरनं ४१८/२०२४ भा.द.वि.स. ३९२,३४ प्रमाणे,
गुरनं १८/२०२४ भा.द.वि.सं.३९२,३४
प्रमाणे,
गुरनं ८६४/२०२२ भा.द.वि.सं. कलम ३९२,३४ प्रमाणे अशा दाखल असलेल्या गुन्हयाची कबुली दिली.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ नागनाथ कदम, पोह १०६३ बिपीनचंद्र ढेरे, पोह ३९६ सुरन हेंबाडे, पोह ४१९ शरद कदम, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह ६०१ नितीन पलुसकर, पोह१७८९ सचिन हेंबाडे, पोह ४९३ नवनाथ माने, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकों १९०४ निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि योगेश नरळे यांनी केली आहे.