आमदाराना जमले नाही ते नितिन काळे यांनी करून दाखवले
पंढरपूर तालुक्यातील धनगर समाजाचे १७८६ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मंजूर
संपादक – दिनेश खंडेलवाल
आमदाराना जमले नाही ते नितिन काळे यांनी करून दाखवले
पंढरपूर तालुक्यातील धनगर समाजाचे १७८६ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मंजूर
पंढरपूर(प्रतिनिधी):- भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव नितीन काळे यांची धनगर समाजासाठी असलेली जिद्द, चिकाटी, आणि पाठपुरावाच्या बळावर गेले तीन दिवसापासून मुंबई मंत्रालय मध्ये तळ ठोकून बसल्याने अखेर धनगर समाजातील गोरगरीब सामान्य लोकांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूर तालुक्यातील १७८६ लाभार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मंजूर करून आणली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या १७८६ घराच्या फाईलवर मंजुरी दिली असून आज तो आदेश मुख्यमंत्री यांच्या सहीने देण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नितीन काळे हे धनगर समाज बांधवांसाठी तन-मन-धन आणि पूर्णपणे झोकून समाजसेवा करीत असलेने त्यांना धनगर समाजामध्ये मानाचे स्थान आहे. त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चाचे सचिव पदी त्यांचे काम सोलापूर जिल्ह्यात उत्कृष्ट असल्याने त्याना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते जवळचे व निकट वरती पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यामुळेच आज अखेर धनगर समाज बांधवांसाठी नितीन काळे यांनी १७८६ अहिल्या घरकुल योजना मंजूर करून आणले आहे.
त्यांच्या केलेल्या पाठपुराव्याला आज अखेर यश लाभले असून सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यातील धनगर समाज बांधवातून त्यांचे कौतुक केले जात आहे.