राजकिय

आ. समाधान अवताडे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपमध्ये जाहीर प्रवेश

माजी नगरसेवकासह शहरातील महत्त्वाच्या भागातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेश

संपादक – दिनेश खंडेलवाल 

आ. समाधान अवताडे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपमध्ये जाहीर प्रवेश

माजी नगरसेवकासह शहरातील महत्त्वाच्या भागातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेश

पंढरपूर(प्रतिनिधी):- नगरसेवक लखन चौगुले, धनुभाऊ धोत्रे, रामा चौगुले, श्रीकांत चौगुले ,दीपक चौगुले ,यांचा आमदार समाधान दादा आवताडे व भारतीय जनता पार्टीमध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक संजय आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश झाला.

पंढरपूरातील वडर समाजातील माजी नगरसेवक व नागालँड चौक तथा लिंक रोड या उपनगरामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे समाजातील नेतेमंडळींनी आमदार समाधान दादा अवताडे यांच्या गटांमध्ये प्रवेश केल्याने याचा मोठा फटका काँग्रेसचे उमेदवार भगीरथ दादा भालके तसेच मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना बसल्याचे बोलले जात आहे.

सध्या भाजपमध्ये इन्कमिंग जोरात चालू असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याचा फायदा आ.समाधान अवताडे यांना होत असून भाजपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इनकमिंग होत आहे.

याचा तोटा विरोधकांना बसत असल्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये भाजप उमेदवाराची ताकद वाढलेली दिसून येत आहे. शहरातील बरेच लोक विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या गटामध्ये येत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close