राजकिय

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध – अनिल सावंत

जातीने लक्ष देऊन काम करण्याचा माझा संकल्प

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध – अनिल सावंत

जातीने लक्ष देऊन काम करण्याचा माझा संकल्प

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करण्याची गरज आहे. आणि याबाबत मी सर्वप्रथम जातीने लक्ष देऊन काम करेल असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने केला.

त्यांचा संपर्क दौरा व पदयात्रा महमदाबाद शेटफळ, लक्ष्मी दहिवडी, लेंडवे चिंचोळे , गणेशवाडी, अकोले आणि कचरेवाडी आदी गावांना भेट दिली. गावकऱ्यांशी चर्चा करत असताना सांगितले की शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. या भागातील पाणी प्रश्न दूर करून या भागाचे नंदनवन करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.

यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.
एकंदरीत अनिल सावंत यांना मंगळवेढा व पंढरपूर भागातून मिळणारा प्रतिसाद व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती यावरून ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा दिसून आला.

येत्या निवडणुकीत असंच सहकार्य करून ‘ तुतारी वाजवणारा माणूस ‘ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन अनिल सावंत यांनी ग्रामस्थांना केले.

‘विठ्ठलाचा तू वारकरी, विधानसभेचा तू मानकरी ‘ अशा प्रकारच्या घोषणा देऊन सर्व ग्रामस्थांनी आपला पाठिंबा अनिल सावंत यांना दर्शवला. तेव्हा वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मय झाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close