पंढरीत अनिल सावंत यांचे पारडे जड;दहा आजी, माजी नगरसेवकांचा पाठिंबा
जनतेचा कौल तुतारीकडे;अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत अनिल सावंत यांचे पारडे जड;दहा आजी, माजी नगरसेवकांचा पाठिंबा
जनतेचा कौल तुतारीकडे;अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल दादा सावंत यांची ताकद वाढत असून मंगळवेढा पंढरपूर मधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्या नंतर आता शहरातील दहा आजी-माजी नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झाल्याने अनिल सावंत यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे.
पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रताप गंगेकर, अक्षय गंगेकर, संतोष नेहेतराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, समाजसेवक अर्जुन पवार सामाजिक कार्यकर्ते आणि आरपीआय शहराध्यक्ष समाधान लोखंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब असबे,सौ. राजश्री गंगेकर, संतोष नेहेतराव, सुरेश नेहेतराव, बाळासाहेब नेहेतराव, आदी विविध पदाधिकारी सह नगरसेवकांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
विविध पदाधिकारी आणि दहा नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानताना अनिल सावंत म्हणाले की महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून, मला पाठिंबा देणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. येणाऱ्या काळात निश्चितपणे आपण सोबत काम करू, तुमच्या येण्याने या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढली असून ती भक्कम झाली आहे.
यावेळी बोलताना संतोष नियतराव म्हणाले की जनतेचा कौल तुतारीकडे आहे. आम्ही पूर्वी राष्ट्रवादीतच होतो. आता पुन्हा अधिकृत प्रवेश केला आहे. आघाडीचेच काम आम्ही करत आहोत. मात्र पंढरपूर मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्षाकडून दोन वेगवेगळे उमेदवार दिले गेले. यामुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. परंतु आम्ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे सर्वजण असल्यामुळे अनिल सावंत यांना पाठिंबा दिला आहे. यापुढे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही राष्ट्रवादी पक्षातूनच लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. इसबावी परिसरापासून अनिल नगर पर्यंत चा परिसर तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या पाठीशी उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले. राम कृष्ण हरी वाजवा तुतारीचा नाराही यावेळी देण्यात आला.