राजकिय

मंगळवेढा येथे घरोघरी जाऊन मतदारांची घेतली भेट;अनिल सावंत यांचे पदयात्रेद्वारे शक्तीप्रदर्शन

मंगळवेढ्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद;शरद पवारांच्या पाठीशी जनता भक्कम

संपादक – दिनेश खंडेलवाल 

मंगळवेढा येथे घरोघरी जाऊन मतदारांची घेतली भेट;अनिल सावंत यांचे पदयात्रेद्वारे शक्तीप्रदर्शन

मंगळवेढ्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद;शरद पवारांच्या पाठीशी जनता भक्कम

पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांचे तुतारी चिन्हाचे पत्र घेऊन त्यांनी आज मंगळवेढा शहराच्या विविध भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटीवाढी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जनतेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरातून जोरात शक्तीप्रदर्शन करत जंगी पदयात्रेस सुरुवात झाली. मंगळवेढा शहरातून निघणाऱ्या पद‌यात्रेत हजारोंचा जनसागर लोटला. या पदयात्रेत मंगळवेढा शहरातून व तसेच विविध ग्रामीण भागातून नागरिक, मतदार , जनता मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

मंगळवेढा शहरातील प्रत्येक घरोघरी उमेदवार अनिल सावंत यांनी भेट देत मतदारांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले.

दामाजी चौकापासून सुरुवात करून पुढे दत्तु गल्ली, नागणे गल्ली, खंडोबा गल्ली, चांभार गल्ली, काझी गल्ली, सराफ गल्ली, गैबीसाहेब दर्गा, पट्टणशेट्टी दुकान, मुरलीधर चौक, हजारे गल्ली, होनमाने गल्ली, शिवाजी तालीम, सनगर गल्ली, शनिवार पेठ, मेटकरी गल्ली, मारवाडी गल्ली अशाप्रकारे संपूर्ण मंगळवेढा शहरात पदयात्रा निघाली.

पदयात्रेत उमेदवार अनिल सावंत यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राहुल शहा, विजय सावंत, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, शिवसेनेचे शहर प्रमुख दत्ता भोसले यांचेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close