राजकिय

प्रा. शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परवराची भूमिका नाही – अनिल सावंत

शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी सहमत नाही;अनिल सावंत आणि परिवार यांचा अभिजीत पाटील यांना सक्रिय पाठिंबा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

प्रा. शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परवराची भूमिका नाही – अनिल सावंत

शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी सहमत नाही;अनिल सावंत आणि परिवार यांचा अभिजीत पाटील यांना सक्रिय पाठिंबा

पंढरपूर(प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी माढा मतदारसंघांमध्ये परिवारातील सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की प्राध्यापक शिवाजी सावंत हे माझे काका आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अनपेक्षितपणे माढा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. साहजिकच त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो मात्र आदरणीय प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वयक्तिक भूमिका आहे.

त्यांच्या भूमिकेशी सावंत परिवार आणि त्यांच्या गटाचे कोणीही सहमत नाही. आमच्या परिवारातील सर्व सदस्यांचा अभिजीत पाटील यांना सक्रिय पाठिंबा आहे. माढ्यामधून अभिजीत पाटील हेच निश्चितपणे निवडून येतील.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांनी लिंक रोड पंढरपूर याठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

दोन दिवसांपूर्वी प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली होती. महाविकास आघाडी कडून अभिजीत पाटील आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे रिंगणात आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघ तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषेदेसाठी माढा मतदार संघातील सावंत परिवार सावंत गटाचे सर्व नेते आणि त्यांचे सर्व नातेवाईक रामा मुसरे वाकाव,डॉ. श्रीमंत कोकटे सर,आकाश लोंढे,सूर्यकांत आप्या शेंडगे (मा. पंचायत समिती सदस्य), रामचंद्र मरके ( जिल्ला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँ पार्टी),बाळासाहेब गाडे पाटील,सरपंच चांदज, भाजनदास वामन खटके नेते माढा तालुका,संतोष ढवळे युवा नेते, मगनसस महाडीक रा.कॉ. नेते,तानाजी लोढे सर) जावाई, विखास पाटील युवा नेते,भारत पाटील माढा तालूका नेते,रंगनाथ पाटिल युवा नेते,निशिकांत कोखे, कृष्णाजी लोढे,(मा. आ. सदस्य लोंढेवाड),अंकुश लोंढे,समाधान मस्के (उपसरपंच (उपसरपंच उदरभाव सुंदरगाव )सत्यम लोढे,शिवाजी कबाडे,डॉ. श्रीमेल कोकाटे आदींनी अनिल सावंत यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले.

या पत्रकार परिषदेमध्ये अनिल सावंत, रवी सावंत, विजय सावंत, आणि सावंत परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close