राजकिय

उमेदवारांच भविष्य ठरवणारी ही निवडणूक नाही तर जनतेचं भविष्य ठरवणारी आहे – नितीन गडकरी

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची मंगळवेढ्यात विराट सभा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

उमेदवारांच भविष्य ठरवणारी ही निवडणूक नाही तर जनतेचं भविष्य ठरवणारी आहे – नितीन गडकरी

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची मंगळवेढ्यात विराट सभा

पंढरपूर(प्रतिनिधी):- उमेदवारांच भविष्य ठरवणारी ही निवडणूक नाही तर जनतेचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. महायुती सरकारच्या काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सर्वच क्षेत्रांत विकासकामे झाली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारसंघातील जनतेपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवण्याचे काम होत आहे. या मतदारसंघातील जनता विकासाला प्राधान्य देऊन पुन्हा एकदा समाधान महादेव आवताडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करेल असा विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे यांच्या प्रचारार्थ विराट जनसभेचे आयोजन आठवडा बाजार, शिवप्रेमी चौक, मंगळवेढा येथे करण्यात आले होते. यावेळी मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे म्हणाले की आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन महायुतीच्या मागे सक्षमपणे उभे राहिले तरच आपल्याला अजून मोठ्या विकासाचा पल्ला गाठता येईल. आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास हाच प्रामाणिक ध्यास समोर ठेऊन संपूर्ण मतदारसंघातील जनतेने महायुतीसोबत उभे राहून हा विकासाचा प्रवास अधिक मजबूत केला पाहिजे असे आवाहन उपस्थितो प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना केले.

सदर प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर दादा कसगावडे, मंगळवेढा भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, रयत क्रांती संघटनेचे भोसले, माजी नगरसेवक अजित आप्पा जगताप, माजी सभापती सुधाकर मासाळ,शिवसेना जिल्हाप्रमुख महेशनाना साठे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माऊली हाळणवर,भाजपा विधानसभा संयोजक तानाजी काकडे आदी मान्यवरांसह भाजप महायुती व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, विविध गावातील सरपंच पदाधिकारी व मतदारसंघातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close