राजकिय

शरदचंद्र पवारांची सूचना आली कामी;शेतकऱ्याचा मुलगा झाला माढ्याचा नवा आमदार

बबनराव शिंदे साठी माढ्याचा पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे

संपादक – दिनेश खंडेलवाल

शरदचंद्र पवारांची सूचना आली कामी;शेतकऱ्याचा मुलगा झाला माढ्याचा नवा आमदार

बबनराव शिंदे साठी माढ्याचा पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे

माढ्यात अभिजित पाटील यांच्याकडून रणजित शिंदे यांना पराभवाचा धक्का

पंढरपूर(प्रतिनिधी):- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील हे ३०,६२१ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार रणजीत शिदेचा व महायुती च्या उमेदवार मीनल साठे यांचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे यंदा शेतकऱ्याच्या मुलाला आमदार करण्याचे भाग्य माढा मतदारसंघाला लाभले आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी भाषणांमध्ये दिलेला सल्ला मतदारांना तंतोतंत लागू पडला आणि त्यांनी त्यांच्या सूचनांचे पालन करत प्रचंड बहुमताने अभिजीत पाटील यांना विजयी केले.

अभिजित पाटील यांना १ लाख ३६ हजार ५५९ तर रणजित शिदेंना १ लाख ५ हजार ९३८ व मिनल साठेंना १३ हजार ३८१ इतकी मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये अभिजित पाटील यांना २५० मतांची आघाडी मिळाली. तीस वर्ष आमदार राहिलेल्या बबनराव शिदेसाठी माढ्याचा पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे. माढा भागात रोखले, पंढरपूर भागात जिंकले मतमोजणीची सुरुवात प्रथम माढा तालुक्यातील ७८ गावांची झाली. या गावात अभिजित पाटील यांनी रणजितसिह शिदे यांना केवळ ५२१ मताधिक्यावर ठेवण्यात यश मिळवले आहे.

सुरुवातीला रणजित शिंदे यांना या पट्ट्यात कमी मताची आघाडी मतमोजणीच्या तेराव्या फेरीपर्यंत कायम होती. मात्र पंढरपूर तालुक्यातील गावातील मतमोजणी सुरु झाल्यानंतर अभिजित पाटील यांच्या मताधिक्यात झपाट्याने वाढ होत गेली. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. पोस्टल मतांमध्येही अभिजित पाटील आघाडीवर राहिले. माढा तालुक्यातील कोंढार पट्टयातील गावात शिदेचा असणारा प्रभाव मतदानातून संपुष्टात आल्याचे चित्र स्पष्ट झाले. महायुतीच्या उमेदवार अॅड, मीनल सा ठे यांना मिळालेली मतं पाहता त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा देखील लाभ मिळाला नाही. अखेर अभिजित पाटील ३० हजार मतांनी विजयी झाले. विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. मतमोजणी केंद्रा पासूनत्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांच्या विजय उत्साहात तृतीयपंथी मतदारांनाही आनंदोत्सव साजरा करण्याचा मोह आवरला नाही.

[विजय सामान्य जनतेला समर्पित….

देशाचे नेते शरद पवार आणि राज्याचे नेते विजयसिह मोहिते पाटील यांचा पाठीशी असलेला आशीर्वाद आणि सामान्य मतदारांनी एका कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलाला आमदार केले आहे. त्यामुळे हा विजय मी सामान्य जनतेला समर्पित करतो असे सांगत तीस वर्षाच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला असुन एकहाती सत्ता केंद्रीत करणा-या पिढीला जनतेने नाकारले.

– नुतन आमदार अभिजित पाटील]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close