
संपादक – दिनेश खंडेलवाल
अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पंढरीत अवकाळी पावसाचा दणका
वातावरणात बदल;नागरिक सुखावले
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला परंतु नेहमीच पंढरपूरला हुलकावणी देणारा अवकाळी पावसाने आज पंढरपूर शहरा सह परिसरात जोरदार दणका दिल्याने वातावरणात बदल झाल्याने नागरिक सुखावले.
सुरुवातीला वादळी वारे सुटले होते. परंतु नंतर मात्र ढगाच्या गडगडाटा सह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता रस्त्यावर पावसाच्या पाण्याने तळावाचे रूप धारण केले. लग्नाची मिरवणूकही पावसामुळे उरकती घ्यावी लागली. शहराच्या सखल भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले. यामुळे रस्त्यावरून जाणारे येणाऱ्यांना मात्र चालताना कसरत करावी लागत होती.
शहराच्या प्रदक्षणा मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नेहमी प्रदक्षणा करणाऱ्यां नागरिकांना पाण्यातूनच वाट काढत प्रदक्षिणा पूर्ण करावी लागली. एक तास मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिर परिसरात नागरिकांबरोबर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली.